*नाशवंत देह एक दिवस जाणार आसल्याने आनंदी रहा. चांगलं कर्म करा.* *ह भ प किसन महाराज पवार यांचे उदगार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नाशवंत देह एक दिवस जाणार आहे, त्यामुळे आनंदी रहा. चांगलं कर्म करा चांगलं कर्म केलं तर चांगले परिणाम मिळतील, वाईट कर्म केलं तर वाईट भोग माणसाला भोगावा लागेल असे उदगार संत मुकुंदरराज देवस्थानचे मठाधिपती ह भ प किसन महाराज पवार यांनी काढले
नवरात्र उत्सवा निमित्य येथील श्री क्षेत्र रेणुका देवी व श्री मूळ जोगाई देवस्थान या ठिकाणी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभातील काल्याच्या किर्तनसेवा प्रसंगी ह भ प किसन महाराज पवार भाविकांना उपदेश देत होते.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथे मधील “पाहती गवळणी, तव पालथी दुधानी ! म्हणे नंदाचिये पोरे ! आजी चोरी केली खरी !! त्याविन हे नासी ! नव्हे दुसरिया ऐसी !! सर्व तुका मेळा ! त्याने अगुणा आणिला “
या अभंगा वर आधारित कीर्तना मधून भाविकांना उपदेश देताना ह भ प किसन महाराज पवार महाराज म्हणाले की, श्री रेणुका देवी संस्थान मध्ये 15 दिवसाचा उत्सव पार पाडने सोपे नाही. इथे 15 दिवस अन्नदान होते हे या ठिकाणच वैशिष्ट्य आहे. मुकुंदराज संस्थानची परंपरा शहरात अनेक ठिकाणी चालू आहे त्या पैकी रेणुका देवी देवस्थान एक आहे.
गोपाळ कृष्ण निर्घृण निराकार होते, सगुण साकार होते. माणसाचा नाशवंत देह एक दिवस जाणार आहे, त्यामुळे आनंदी रहा. चांगलं कर्म करा चांगलं कर्म केलं चांगले परिणाम मिळतील भोग, वाईट कर्म केलं तर वाईट भोग माणसाला भोगावा लागेल.
संत महात्मे कधी जन्माला यायचे किती दिवस रहायचे त्यांच्या हातात कधी जायचं त्यांच्या हातात आहे. तुमच आमचं जीवन मात्र कर्मावर अवलंबुन आहे.
मुला साठी कितीही कमावल तर आई बापाला म्हणतात आमच्या साठी काय केलं? त्या साठी पैसा कमी कमवा मात्र चारित्र्य संपन्न पिढी घडवण्याची आज काळाची गरज आहे.
नवरात्र उत्सवा निमित्य श्री रेणुकादेवी व श्री मुळजोगाई देवस्थान, अंबाजोगाई येथे कै. मुकुंदअप्पा यादव कै. शामलाल मोदी, कै. शिवाजीराव अंबेकर, कै. बी. एन. सातपुते, कै. ताराचंद परदेशी यांच्या प्रेरणेने व वै. माधवबुवा शास्त्री, किसन महाराज पवार यांच्या आशिर्वादाने नवरात्रौत्सवा निमित्य श्री योगेश परदेशी, देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक व पुजारी श्री. दत्तात्रय अंबेकर व उत्सवाचे चालक नानाश्री यादव, मनोज जाधव, प्रमोद पाटील, टिंकू परदेशी, राज कुडके, परमेश्वर दोनगहु, ओम दोनगहू, रजनीकांत हुलगुंडे, राहुल मोदी, शिवानंद हरंगूळे, यांच्या सह असंख्य भाविकांच्या उपस्थिती मध्ये घटस्थापना झाल्या नंतर श्री विष्णुशेठ बजाज यांच्या हस्ते गाथा पुजनाने महोत्सवा निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. या उत्सवात श्री.ह.भ.प. बाळासाहेब महाराज कुलकर्णी, श्री.ह.भ.प. विकास महाराज गडदे, श्री.ह.भ.प. गुरुवर्य अच्युत महाराज जोशी, ह भ प अमोल महाराज गोरे सोनपेठकर, ह.भ.प. डॉ. पांडुरंग महाराज तिडके, श्री.ह.भ.प. डॉ. नाथराव महाराज गरजाळे, श्री.ह.भ.प. शिवाजी महाराज ठोंबरे, श्री.ह.भ.प. गोविंद महाराज सुकरे की ना वारकरी संस्था, अंबाजोगाई), ह भ प पांडुरंग महाराज कोकाट नांदगाव, ह भ प प्रमोद महाराज आव्हाड, श्री.ह.भ.प.गजानन महाराज सुवर्णकार घाटनांदूर, श्री. ह. भ. प. श्रीकृष्ण महाराज चवार, श्री. ह. भ. प. प्रभाकर महाराज उगले यांनी कीर्तन सेवा दिल्या नंतर ह भ प किसन महाराज पवार यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची व आराधी मेळ्याने उत्सवाची सांगता झाली.
उत्सव काळात अशोक मोदी यांच्या हस्ते होम-हवन होवून श्री रेणुका देवी पालखीची गावभर परिक्रमा झाली यावेळी जागोजागी भक्तांनी पालखीचे स्वागत केले.
संपूर्ण उत्सव काळात संत सावता महाराज भजनी मंडळ अंबाजोगाईचे प्रमुख अमोल महाराज घोडके व त्यांचे सहकारी पद्माकर महाराज महामुनी, संजय अंकुलवार, ज्ञानोबा डोंगरे, दिलीप आपेगावकर, बालासाहेब महाराज कुलकर्णी, अशोक महाराज क्षीरसागर, धनेगावकर, हरणे महाराज, हरिदास बामणे महाराज, किशोर महाराज ईरलापल्ले, बिरुदेव सोन्नर, बालासाहेब विखे पाटील, मदन महाराज जाधव, शिवाजी पांचाळ, कचरे महाराज निवृत्ती विणेकरी, दशरथ महाराज कदम वादक अभिषेक महाराज तांदळे, शुभम तिवारी, महारुद्र नरवणे, दत्ता गायकवाड, दिगंबर महाराज घाटनांदुरकर, दत्ता माले, बबन आपेट
यांनी 15 दिवस कीर्तन सेवेत आपला सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी
अशोक मोदी, मनोज मोदी, सितेंद्र सातपुते, रामेश्वर रांदड, मनोज जाधव, योगेश परदेशी, प्रमोद पाटील, सौ शामल अंबेकर, श्री. राज कुडके, गणेश अंबेकर, प्रतिक्षा अंबेकर, प्रांजली अंबेकर, परमेश्वर दोनगहु, राहुल मोदी यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
