अंबाजोगाई

*स्वा रा ती रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाचा हैदोस, डॉक्टरला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारण्या साठी अंगावर धाव*

डॉक्टरनेच रुग्णास मारहाण केल्याचा व दागिने काढून घेतल्याचा खोटा गंभीर आरोप करत नातेवाईकांच्या चोराच्या उलट्या बोंबा
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    स्वा रा ती रुग्णालयातील डॉ ऐश्वर्या पाटील यांना एका रुग्णाच्या नातेवाईक पतीपत्नीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्याना मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा दुर्देवी प्रकार आज येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील वार्ड क्र 20 मध्ये घडला असून चोराच्या उलट्या बोंबा या म्हणी प्रमाणे डॉक्टरनेच रुग्णास मारहाण केल्याचा व आपले दागिने काढून घेतल्याचा खोटा गंभीर आरोप केल्या केल्याने दिवस रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता ढासळली आहे.
    या विषयी प्राप्त माहिती अशी की, स्वा रा ती रुग्णालयातील वार्ड क्र 20 हा महिलांचा मेडिसिन वार्ड असून वार्ड मध्ये उपचारार्थ दाखल निर्मला मोरे यांच्या नातेवाईकांनी 60 वर्षीय महिला रुग्णास डॉ ऐश्वर्या पाटील यांनी चापट मारल्याचा आरोप केल्या नंतर वास्तव परिस्थितीची माहिती घेतली असता डॉ ऐश्वर्या पाटील मॅडम या अतिशय शांत व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर असून पेंशट निर्मला मोरे यांच्या नातेवाईक पती पत्नीने डॉक्टरलाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, डॉक्टर मॅडमच्या अंगावर मारायला गेले. मुळात महिलांच्या या वार्ड मध्ये पुरुषांना प्रवेश असायलाच नको. तरीही त्या पुरुष नातेवाईकाने वार्ड मध्ये प्रवेश करून आपला पुरुषी प्रताप या ठिकाणी दाखवण्याचा प्रकार केला. डॉ ऐश्वर्या पाटील यांना त्या नातेवाईक पतीपत्नीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्याना मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा दुर्देवी प्रकार केला.
    हा प्रकार पाहून अन्य रुग्णांचे नातेवाईक व वार्ड मधील अन्य कर्मचाऱ्यांनी मॅडमला एका रूम मध्ये नेऊन बसवले तरीही त्या रुग्णांचे नातेवाइकांची रूमच्या बाहेरून शिवीगाळ सुरूच होती, एवढंच नव्हे तर त्या नातेवाईक महिलेने तिच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून घेतल्याचा खोटा आरोप केला. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या नातेवाईकांना बाहेर काढले. डॉक्टर पेशंटसाठी दिवस रात्र राबतात त्यांना अंघोळ ,जेवण ,झोप वेळेवर मिळत नाही प्रचंड त्रास मेहनत करून रुग्णाचे जिव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकजण प्रयत्न करतो हे वास्तव आहे. पेशंट जर गळ्यातील वस्तू डॉक्टरने चोरल्याचा आरोप करत असेल तर त्यांची वर्तणूक चुकीची आसून रुग्णांचे नातेवाईक आशा पद्धतीने डॉक्टर ला वागणूक देत असतील, खोटे आरोप करत असतील तर डॉक्टरांची काम करण्याची मानसिकता राहणार नाही.
   याची वास्तव माहिती घेण्यासाठी वार्ड मधील अन्य रुग्णाच्या नातेवाईकाशी संपर्क केला असता त्यांनी वास्तव परिस्थितीची आंखोदेखी सांगितली यात डॉक्टर ऐश्वर्या पाटील मॅडम यांचा काडी मात्र दोष नसल्याचे समोर आले आसून हाच प्रकार संबंधित नातेवाईकांनी एखाद्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर सोबत केला असता तर त्या नातेवाईकांना जेल मध्ये जावं लागलं असत मात्र शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना अखेर वाली कोण हा प्रश्न आशा प्रकारा मधून निर्माण होत आहे.
    या संदर्भात या विभागाचे विभाग प्रमुख डॉ सिद्धेश्वर बिराजदार यानी मी घटनेची माहिती घेऊन कोणावर ही अन्याय होणार नाही असे सांगितले तर स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांनी झालेल्या प्रकारा विषयी वास्तव माहिती व्हावी या साठी चौकशी समिती नियुक्ती करण्यात येईल असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!