मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर 22 ऑक्टोबर रोजी रक्ताचे नमुने देण्याचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी
मराठी पत्रकार परिषद, अंबाजोगाई व आय एम ए सांस्कृतीक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबिया साठी 27 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून मंगळवार दि 22 ऑक्टोबर रोजी रक्ताचे नमुने देण्याचे आवाहन वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ राजेश इंगोले यांनी केले आहे.
दैनंदिन धावपळीच्या जीवनात सर्व पत्रकार बांधव आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष करतात व या मधूनच नकळत आपल्या शरीरात एखादा गंभीर आजार आपल्याला जडतो व ज्यावेळी आपल्याला हे कळत त्यावेळी वेळ हाता मधून गेलेली असते. त्या मुळेच वर्षातून किमान 1 वेळ तरी आपल्या शरीरातील बदलाची माहिती व्हावी, त्यावर वेळेत उपचार व्हावेत म्हणून प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मा एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई व आय एम ए सांस्कृतीक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबिया साठी आरोग्य तपासणी शिबिर घेत असून अत्यावश्यक असलेल्या सर्व रक्ताच्या तपासण्या ज्याची की बाजारात मुळ तपासणी किंमत 3000 आहे परंतु आपल्याला सवलतीच्या दरात ह्या तपासण्या फक्त 800 रुपये मध्ये करून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. ज्या पत्रकार बांधवांना आपल्या आरोग्या विषयी चिंता किंवा खबरदारी घ्यावी वाटते त्या सर्वांनी मंगळवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी काहीही न खाता पिता (उपाशी पोटी )आपल्या रक्ताचे नमुने व 800 रु फिस डॉ राजेश इंगोले यांचे समाधान मानसोपचार रुग्णालय या ठिकाणी जमा करावी.
या सर्वांचे रक्ताचे नमुने तपासणी साठी मुबंई येथे पाठवण्यात येणार असून रविवार दि. 27 ऑक्टोबर रोजी आलेल्या ब्लड च्या रिपोर्ट नुसार तज्ञ
डॉ दीपक कटारे (हृदयरोग तज्ञ),
डॉ नागोराव डेरनासे (मधुमेहतज्ञ),
डॉ प्रज्ञा किनगावकर (नेत्ररोगतज्ञ),
डॉ जिगिशा मुळे (त्वचा रोग तज्ञ),
डॉ संदीप जोगदंड (मेडिसीन)
आदी डॉक्टर बांधव रिपोर्ट नुसार पत्रकारांची प्रत्यक्ष तपासणी करून औषधोपचार व आहारा विषयी आपणास मार्गदर्शन करतील हे आरोग्य तपासणी शिबीर सर्व पत्रकार बांधवा साठी खुले असल्याने अधिकाधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी या आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन
डॉ राजेश इंगोले (वैद्यकीय कक्ष प्रमुख )
दत्तात्रय अंबेकर (हल्ला विरोधी कृती समिती जिल्हा निमंत्रक), प्रशांत लाटकर (तालुका अध्यक्ष) अभिजीत लोमटे (डिजीटल मीडिया अध्यक्ष)
यांनी केले आहे.
