हनुमान नगर नवरात्र दांडिया महोत्सवात माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे यांच्या हस्ते 81 महिलांचा सन्मान*
*अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नुकत्याच झालेल्या हनुमान नगर नवरात्र दांडिया अंतिम फेरीतील 12 विजेतेपद पटकावणारया विजेत्यांना माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर युवा नेते दिपक भैय्या शिंदे,मा.नगरसेवक दिलीप काळे सह आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.*
यावेळी बोलताना त्यांनी छञपती गणेश मंडळ आयोजित हनुमान नगर नवरात्र दांडिया उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व 81 महिलेंच्या सन्मान उपक्रमास शुभेच्छाही देत पुढील वर्षांत असाच उपक्रम राबविण्यात यावा असे मत व्यक्त केले.नवरात्र दांडिया चे हे प्रथम वर्ष आहे.या दांडिया उत्सवाचे अध्यक्ष बालाजी खैरमोडे यांनी अथक परिश्रम घेत हनुमान नगर, हावळे गल्ली नव्हे तर अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत एक उत्तम उदाहरण देऊन महिलेंचा सन्मान कसा करायचा असतो ते दाखवून दिले.संपूर्ण 9 दिवस महिला वर्गाला सन्मान देण्याचे काम त्यांच्या सोबत असलेले चेतन रामरूले,संतोष बिचकुले,संजय सुर्यवंशी,रवि लाड,दत्ता पवार, मुन्ना लोहार,विठ्ठल गुळभिले,अक्षय कदम, अभिषेक पाटील, शंकर भिसे,योगेश पिंगळे, शुभम काचरे,उत्तम हुलगुंडे,सदगूरू शितोळे,राजेश भिसे,कांबळे, शिवम चव्हाण,पप्पू हावळे आदींनी प्रचंड मेहनत घेवून सुंदर असा उत्सव साजरा केला,असे मत व्यक्त केले.यावेळी माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे यांचा सत्कार सर्व प्रथम सौ.राजश्री पाटील,सौ.शिल्पा गंभीरे,सौ.मनिषा सुर्यवंशी,सौ.आशा खैरमोडे,सौ.महानंदा रामरूले,सौ.दिपाली हावळे,सौ.संगीता कदम, सौ.भारती लखेरा,सौ.रेखा रेणापूरे यांच्या हस्ते करण्यात आला तर उत्स्फूर्त स्वागत सौ.वर्षा रामरूले,सौ.सुवर्णा खैरमोडे,सौ.भाग्यश्री बिचकुले,सौ.वंदना आपेट,सौ.सुवर्ण माला केंद्रे,सौ.साधना रेणापूरे,सौ.संगीता काचरे,सौ.महानंदा शितोळे,सौ.पूजा शर्मा यांनी केले.
अंतिम फेरीत पर्यवेक्षक म्हणून संतोष मोहिते,नितिन पराधिया यांनी काम पाहिले.
*यामध्ये महिला वर्गांतून तब्बल 7 पारितोषिक काढण्यात आले.उत्तेजनार्थ नंबर (26,81,13,16) चार काढण्यात आले.तर तृतीय (33),व्दितीय (136),प्रथम (05)* *अनुक्रमे एक असे क्रमांक काढण्यात आले.तर पुरूष गटातील प्रथम (04),व्दितीय (99),तृतीय (53),उत्तेजनार्थ (01),उत्तेजनार्थ (108) अशा सर्व विजेतेपद पटकावणाऱ्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली.पारितोषिक चे सौजन्य लोकमान्य नागरी सहकारी बँक चे संस्थापक दत्तात्रय कदम व सौ.संगिता कदम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दरम्यान, गेल्या 9 दिवसात दांडिया मंडपात उत्कृष्ट रांगोळी काढणे असो वा स्वच्छतेचे काम असो,साहित्याची ने आण,छोट्या मोठ्या महिलांना दांडिया शिकवणे व इतर कारय करणारया प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारया रवि लाड, हर्षल लखेरा,शंकर गाढवे ,मुन्ना लोहार,साखरे,सौ.पूजा शर्मा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच दररोज 6 पारितोषिक ठेवण्यात आले होते 9 दिवसातील एकूण 54 विजेत्यांना शिल्डचे वितरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर बालाजी खैरमोडे,संजय गंभीरे,संजय सुर्यवंशी, चेतन रामरूले,संतोष बिचकुले,अक्षय कदम,अभिषेक पाटील,शंकर भिसे आदींच्या हस्ते शिल्डचे वितरण करण्यात आले. सदरील शिल्ड संजय गंभीरे यांच्या सौजन्याने देण्यात आले तर सहभाग प्रमाण पञ बालाजी खैरमोडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश भिसे,अमोल खैरमोडे,बालाजी गोडसे,विशाल मुंदडा,देविदास खैरमोडे,दिपक रेणापुरे,शुभम खरात,सचिन भिसे शितल शर्मा,विष्णू शर्मा,सिध्दाजी पवार, सुधाकर काचरे,रूद्र शर्मा, ऋषीकेश राऊत, अविष्कार खैरमोडे,लखन शिंदे,हितेश डिडवाणी,उत्तम हुलगंडे,धनंजय हावळे,शंकर ठाकुर,गोविंद डबरे,अतुल हावळे,मयुर सुर्यवंशी,अक्षय हावळे,निखिल खरात,अभय हावळे,धिरज काटे,राजेश भिसे आदींनी प्रचंड मेहनत घेतली.
