*सेन्ट्रीग ठोकत असताना लाकुड तुटल्याने अनिल हेडे या बांधकाम मजुराचा जागीच मृत्यु*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तिसऱ्या मजल्याच्या सज्जाची सेन्ट्रीग ठोकत असताना खालचे लाकुड तुटल्याने अनिल लक्ष्मण हेडे या बांधकाम मजुराचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मागील बाजूस घडली.
या दुर्देवी घटने विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या वसाहती मध्ये पो कॉ नेहरकर यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू असून आज सकाळी अनिल लक्ष्मण हेडे (रा धनगर गल्ली) हा बांधकाम कामगार या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्याच्या सज्जाची सेन्ट्रीग ठोकत असताना सज्जाच्या खालचे लाकूड अचानक तुटल्याने वर काम करणारा अनिल थेट तिसऱ्या मजल्याहुन जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला व मेंदूला मार लागल्याने स्वा रा ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.
मृत्यू समयी अनिलचे वय 35 होते त्याला पत्नी, 1 मुलगा, मुलगी असा परिवार असून या दुर्देवी घटने मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
