अलखैर पतसंस्थेला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मोहम्मद उमरेन यांची सदिच्छा भेट
अलखैर पतसंस्थेला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मोहम्मद उमरेन यांची सदिच्छा भेट
*अंबाजोगाई/प्रतिनिधी* शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव आणि देशातील प्रसिद्ध असे कुरानचे व्याख्याते हजरत मौलाना मोहम्मद उमरेन मेहफूज रहमानी यांनी सदिच्छा भेट देऊन पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक केले. पतसंस्थेच्या वतीने यावेळी चेअरमन शेख उमर फारूक सह इतर मान्यवरांनी सत्कार केला.
.
कुरआन व्याख्याते, हज़रत मौलाना मोहम्मद उमरैन महेफुज रहेमानी (सेक्रेटरी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड) यांनी सोमवार दि. 7 ऑक्टो.2024 रोजी शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांना अलखैर
पतसंस्थेचे अध्यक्ष शेख उमर फारूक सर यांनी अलखैर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अंबाजोगाईला सदिच्छा भेट देण्याची विनंती केली त्यानुसार मौलाना यांनी पतसंस्थेत भेट दिली असता संस्थेचे अध्यक्ष यांनी पतसंस्थेच्या कामाची व उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. या वेळी संस्थेचे काम पाहून मौलाना यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. पतसंस्थेच्या प्रगतिसाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. प्रसंगी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष शेख उमर फारूक सर यांनी आदरणीय मौलाना यांचा सत्कार केला.या वेळी जमीयते-उलमा- ए हिंद अंबाजोगाईचे अध्यक्ष मौलाना अकबर इशाती, हाफेज शेख मुजक्कीर, हाफेज सादेक इशाती, मौलाना तैमूर, अलखैरचे सचिव शेख तालेब चाऊस, संचालक शेख मुजाहेद सर, शेख रिज़वान सर, जेष्ठ समाजसेवक शेख शाकेर साहब, मौलाना मुश्ताक हुसैन नदवी, बदर हुसैन उस्मानी, पठान अमजद, फारूकी फहाद सर यांच्यासह इतर मान्यवर, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
