अंबाजोगाई

मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारणी निवडणूक *बीड जिल्ह्यातून ठाले पाटील गटाचे दगडू लोमटे, प्राचार्य दीपा क्षीरसागर व अनंत कराड हे उमेदवार

 

अंबाजोगाई – मराठवाडा साहित्य परिषद छ. संभाजीनगर या संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या गटाकडून २२ उमेदवार उभे असून बीड जील्हातून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अंबाजोगाईचे दगडू लोमटे, बीडच्या प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर तर शिरूर कासार येथील अनंत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकूण २२ जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण ३७ उमेदवार उभे आहेत. ठाले पाटील यांच्या गटाकडून २२ उमेदवार त्यात उभे आहेत. त्यात प्राचार्य कौतिकराव ठाले – पाटील, डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, डॉ. किरण सगर, संजीव कुलकर्णी, दगडू लोमटे, डॉ.ऋषिकेश कांबळे, देविदास फुलारी, प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, रामचंद्र तिरुके, नितीन तावडे, संजीवनी तडेगावकर, आसाराम लोमटे, डॉ. रामचंद्र काळुंखे, संतोष तांबे, सरोज देशपांडे, जयद्रथ जाधव, अनंत कराड, प्रा. गणेश मोहिते, प्राचार्य नामदेव वाबळे, हेमलता हिंगमिरे.पाटील व सुभाष कोळकर हे उमेदवार आहेत.
बीड जिल्ह्यातून दगडू लोमटे यांना दुसऱ्यांचा संधी मिळाली आहे. त्यांनी गेल्या वेळी निवडून आल्यावर, अंबाजोगाई येथे मराठवाडा साहित्य संमेलन घेण्यासाठी प्रयत्न केले. प्रा. रंगनाथ तिवारी यांना त्या संमेलनाचे अध्यक्षपद देण्यासाठी मोलाची भूमिका घेतली होती. साहित्य परिषदेच्या अनेक उपक्रमात, विकासात्मक आणि रचनात्मक कामात सतत सहकार्य व सहभाग उल्लेखनीय होता. तुळजापूर येथील नव्याने शाखा उभारणीसाठी महत्वाची भूमिका होती. ते मराठवाडा साहित्य परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी त्यांना ठाले पाटील, डॉ. दादा गोरे, डॉ. किरण सगर, के. एस अतकरे या इतर वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांना पुन्हा आग्रहाने संधी दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व आजीव सभासद असलेल्या सदस्य मतदारांनी वरील २२ उमेदवारांना मतदान करावे असे दगडू लोमटे, दीपाताई क्षीरसागर व अनंत कराड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!