अंबाजोगाई

*सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईची  अतिक्रमण धारकांचे शहर म्हणून ओळख निर्माण होतेयं*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   एकेकाळी सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा लाभलेले शहर म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाई शहराची ही ओळख आता पुसल्या गेली असून ही ओळख आता अतिक्रमण धारकांचे शहर म्हणून निर्माण होताना दिसत आहे.
     अंबाजोगाई शहराची ओळख एकेकाळी सांस्कृतिक शहर म्हणून होती कारण या शहरात उपजत कलागुणांना वाव मिळावा या साठी सतत काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम होताना दिसत होते, गणेशोत्सव काळामध्ये तर कार्यक्रमाची एवढी रेलचेल असायची की चिमुकली मुले, तरुण वयोवृद्ध जाण्यासाठी वाहनाचे साधन उपलब्ध नसतानाही 5- 5 किलोमीटर चालत जायची. त्या मुळे अनेक कलावंत या ठिकाणी घडले, ज्यांनी की आपली ओळख केवळ अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्या पूर्ती निर्माण केली नाही तर देश विदेशात अंबाजोगाईचे नांव पोचऊन एक वेगळी ओळख निर्माण केली.
    शैक्षणिक परंपरे सोबत शैक्षणिक वारसा लाभलेले शहर म्हणून अंबाजोगाईची ओळख होती.  शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेत त्या काळी गुरू शिष्याची खऱ्या अर्थाने परंपरा जोपासली जायची. गुरू शिष्यांना एकमेका विषयी आदर असायचा. या शैक्षणिक संस्थेत घडलेले विद्यार्थी केवळ डॉक्टर इंजिनिअर, न्यायमूर्तीच झाले असे नाही तर राज्याच्या राज्यपाल पर्यंत पोचले. मात्र आज सर्वच शिक्षण संस्थेत शिक्षणाचा बाजार मांडल्या गेला आहे. खाजगी शिकवण्या घेणारी अनेक दुकाने पावलो पावली निर्माण होतायंत तरीही शिक्षणाचा दर्जा सुधरण्या ऐवजी ढासळत चाललेला दिसून येतोय.
    एकूणच अंबाजोगाईची सांस्कृतिक व शैक्षणीक शहर म्हणून असलेली ओळख ही पुसल्या गेली आहे हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही.
   आंबाजोगाईची हीच ओळख आता अतिक्रमण धारकांचे शहर म्हणून निर्माण होताना दिसत आहे. कारण  शहरात धनदांडग्यानी सुरू केलेकी परंपरा आता तळा गाळा पर्यंत पोचली आहे. आज शहर व परिसरात जीसकी लाठी उसकी भैस अशी म्हणण्याची वेळ आली असुन धनदंडग्यांनी एकेकाळी 33 मीटर असलेली जयवंती नदी अतिक्रमण करून नाला बनवली. हीच नदी पूढे वाण नदीला मिळते त्या वाण नदी मध्ये ही अतिक्रमन करून लोकांनी जमिनी वहीती केल्या. अंबाजोगाई शहरातील भगवान बाबा चौक ते सावरकर चौक पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पुढे संत भगवान बाबा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वा रा ती रुग्णालय या रस्त्यावर जागोजागी कोंबडे, बकरे कापून लटकलेले आपल्याला दिसतील. तेही अतिक्रमण केलेल्या जागेवर.
    कुलस्वामिनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून येणाऱ्या भाविकांना आल्या बरोबर दर्शन घडते ते रस्त्याच्या कडेला लटकलेल्या कोंबड्या बकऱ्यांचेच. शहरातील एकही प्रमुख रस्ता नाही की ज्या रस्त्यावर अतिक्रमण नाही. शहरात व बाहेर ही ज्या काही शासकीय जमिनी आहेत त्यावरही मोठमोठे बंगले बांधून अतिक्रमणे केली गेली आहेत. स्वा रा ती रुग्णालया च्या पायथ्याला तर शेकडो एक्कर जमिनीवर अतिक्रमित वस्त्या उभा राहिल्या आहेत. एकेकाकी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर परिषदेच्या मालकीची धर्मशाळा होती. या धर्म शाळेत गोरगरीब, पीडित यांना आश्रय मिळत होता. मात्र आज सभोवतालच्या व्यापाऱ्यांनी ही धर्मशाळा अक्षरशः चोरली आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.
     आज आ नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून शहराच्या रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी आला मात्र रस्त्यावरील अतिक्रमणा मुळे ज्या पद्धतीने रस्ते व्हायला हवे त्या पद्धतीने झालेले नाहीत. कंत्राटदाराला नाईलाजाने उपलब्ध जागेवरच रस्ते बनवण्याची वेळ आली. आज शहरातील देवस्थानला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमित जमीन धारक स्वतःच्या “बा” ची जमीन असल्या प्रमाणे रस्त्याची कामे अडवत आहेत.
    मताच्या गणिता मुळे एकही राजकीय पुढारी या अतिक्रमणा विषयी ब्र शब्द काढत नाही. प्रशासनातील एकही मर्द अधिकारी अतिक्रमणे काढण्याचे धाडस दाखवायला तयार नाही, जो अधिकारी येईल तो आपल्याला तीन वर्षे रहायचे आहे, कशाला कोणाशी वैर म्हणून केवळ टोपले टाकण्याचे काम करतो आहे.
     एकूणच अतिक्रमित शहर म्हणून ओळख निर्माण झालेले हे शहर दिवसेंदिवस चित्र विचित्र बनणार बनणार त्या वेळी वेळ गेलेली असणार हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!