*जेष्ठ विधिज्ञ एड.असीम सरोदे अंबाजोगाई नगरीत* ■ *मा.खा.कॉ. बुरांडे स्मृती व्याख्यानमालेत साधणार संवाद*
अंबाजोगाई / प्रतिनिधी
शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन समर्पित करणारे झुंजार स्वातंत्रसेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे पुणे येथील ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी ‘संविधानाची पायमल्ली होत आहे का?’ याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार दि 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉ. अप्पा यांच्या स्मृतीदिनानिमित्य आयोजित व्याख्यानमाला ही संविधानिक मूल्याची जोपासना करत, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, परिवर्तनवादी व पुरोगामी विचाराचे व्यासपीठ म्हणून
वेगळी ओळख निर्माण करणारी ठरली आहे. या स्मृती व्याख्यानमाला मंचावर आज तगायत विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा, जागतिक संगणक तज्ञ डॉ. अच्युत गोडबोले, मा.पोलीस आयुक्त सुरेश खोपडे, माकप चे राष्ट्रीय महासचिव कॉ. सिताराम येचुरी, ख्यातनाम पत्रकार पी. साईनाथ, सिटीजन फॉर पीस अॅड जस्टीस च्या तिस्ता सेतलवाड, पुरोगामी विचारवंत प्रा. राम पुनियानी, प्रा.डॉ. मेघा पानसरे, माजी न्यायमूर्ती बॅरीस्टर बी.एन. देशमुख, विद्यार्थी नेते कन्हेया कुमार,माजी व्यायमुर्ती बी.जी कोळसे पाटील, माजी कुलगुरू प्रा.डॉ. नागनाथ कोतापल्ले, अनिसच्या मुक्ता नरेंद्र दाभोळकर, आदी व्यक्ती, शेती, अर्थ आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात परिवर्तनवादी प्रयत्नशील असलेल्या मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे.
विद्यमान बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी जेष्ठ विधी तज्ञ एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.
