*महायुती सरकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी साठी अनेकविध घोषणांचा पाऊस पाडत असलं तरी राज्यात म वि आ व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार साहेबांची क्रेझ वाढली*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मागील अडीच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडी नंतर सत्तेत आलेल महायुती सरकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी साठी अनेकविध घोषणांचा पाऊस पाडत असलं तरी संपुर्ण राज्या मधेच महाविकास आघाडी आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार साहेबांची क्रेझ तळा गाळा पर्यंत वाढलेली सर्वत्र दिसून येत आहे.
सन 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार अडीच वर्षे सत्तेवर राहिले आणि मागील अडीच वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेले 2 गट यातून उदयाला आलेले किळसवाणे राजकारण आणि यातून राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीच्या नेत्याला मिळालेली सहानभूती व यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश संपूर्ण देशाने पाहिले.
दरम्यानच्या काळात जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयोग झाले. मात्र हे प्रयोग अयशस्वी झाले. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत महायुतीला झाला नाही. उलट राज्यात उभा राहिलेल्या मराठा आरक्षणाचा फटका जरांगे फॅक्टर मुळे महायुतीला बसला हे मात्र निश्चित आहे.
लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश पाहून राज्यातील महायुतीचे नेते मुख्यमंत्री मा ना एकनाथ राव शिंदे, ज्यांनी महाविकास आघाडीची बिघाडी करण्याचा संकल्प केला होता असे राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस, ज्यांना सोबत घेऊन महायुतीची होती नव्हती तेवढी गेली ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार या सर्वांनी भविष्यातील संकट पाहून राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक विध घोषणांचा पाऊस पाडत असल्याचे दिसत असुन.
महायुती सरकार ने घोषणांचा पाऊस पाडताना सर्वच घटकांना खुश करण्याचा निश्चित प्रयत्न केला असला तरी महायुतीचं पारड काही जड व्हायला तयार नाही आणि ही बाब महायुती आणि भाजपाच्या अंतर्गत सर्व्ह वरून समोर आलेली आहे हे कोणी नाकारू शकत नाही.
ज्या वेळी भाजपाने प्रत्येक आमदाराला 50 खोके देऊन शिवसेना फोडली, निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून भाजप कडे गेलेल्या एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे धनुष्य चोरले त्या मुळे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची क्रेज राज्यात वाढली तळागाळात उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानभूती निर्माण झाली. तीच परिस्थिती भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांना आपल्या कळपात सामील करून घेतले त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या बाबतीत झाली आणि याचाच फटका महायुतीला लोकसभा निवडणुकांमध्ये बसला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.
लोकसभे नंतर निवडणुकीचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आता राज्य आणि देश पाहनार असुन विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे राज्य भरातील सर्वच मतदार संघा मधून उमेदवारी मागण्यांसाठी इच्छुकांची इनकमिंग मोठ्या प्रमानावर दिसते आहे. पवार साहेबांची ताकत पाहून हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील यांच्या सह अनेक दिग्गज शरदचंद्र पवार यांच्या गटात सामील झाले असून पवारांना सोडून भाजपात गेलेले, पवारांना सोडून अजित दादा पवार यांच्या सोबत गेलेले अनेक नेते घर वापसी साठी शरदचंद्र पवार यांच्या घराचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत.
एकूणच महायुती सरकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी साठी अनेकविध घोषणांचा पाऊस पाडत असलं तरी संपुर्ण राज्या मधेच महाविकास आघाडी आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार साहेबांची क्रेझ तळा गाळा पर्यंत वाढलेली सर्वत्र दिसून येत आहे हे मात्र निश्चित.
Post Views: 263