*माजी नगरसेवक गणेश मसने यांची मतदारांना पैसे देण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता*
—————————— ———-
—————————— ———-
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
मतदारांना पैसे देेवून प्रलोभन दाखवत आसल्याच्या आरोपा मधून
माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे कट्टर समर्थक व माजी नगरसेवक गणेश मसने यांची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री मेहता साहेब यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सन 2016 च्या नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्र. 3 मध्ये माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे कट्टर समर्थक व माजी नगरसेवक गणेश मसने हे मतदारांना पैसे देेवून प्रलोभन दाखवत आणि प्रत्यक्ष पैसे वाटताना निदर्शनास आल्या नंतर वार्ड क्र. 3 मधील मनसेचे उमेदवार असलेले उमेश दत्तात्रय पोखरकर यांनी मसने यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आणि मसने यांच्या खिशातून पैसे काढून घेवून ते जप्त करण्यात आले या तक्रारी वरून
तत्कालीन भरारी पथक प्रमुख निवडणूक आयोग यांनी शहर पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे गु.र.न.475/2016 भा द वी 171 ई, 188, 223(आय), (बी) नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांनी केला केला व आरोपी गणेश मसने विरुद्ध मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांचे कोर्टात दोषारोप सादर केले होते. हे प्रकरण अंबाजोगाई न्यायालयात गेली आठ वर्ष चालल्याने या प्रकरणाच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने विधीज्ञ इस्माईल गवळी यांनी आरोपीची बाजू मांडली व सरकारतर्फे सादर दोषारोप व त्यातील आरोप फेटाळून लावले व योग्य आवश्यक युक्तिवाद केला आरोपीतर्फे विधीज्ञ इस्माईल गवळी यांनी केलेला युक्तिवाद मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री मेहता साहेब यांनी ग्राह्य धरून माजी नगरसेवक गणेश मसने यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात ऍड आय वाय पठाण,आसेफ़ प्यारेवाले, इरफान पठाण, सलीम गवळी व विधीज्ञ सुजाता साळवे यांनी सहकार्य केले.
