*गरकल साहेब, आपल्यात हिम्मत असेल तर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे अडवण्या पेक्षा आपल्या हद्दीत अतिक्रमित केलेल्या वान नदी पात्रातील जमिनीवर सुरू असलेल्या दारूच्या भट्ट्या बंद करून मर्दांनगी दाखवावी*
*आ सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरात नगरोथान योजने अंतर्गत सुरू असलेल्या कोटयावधी रुपयांच्या रस्त्याच्या कामाला वनविभाग व काही अतिक्रमण धारकांचा अडथळा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरात नगरोथान योजने अंतर्गत सुरू असलेल्या कोटयावधी रुपयांच्या रस्त्याच्या कामाला वनविभाग व काही अतिक्रमण धारक नागरिक अडथळा करत असल्याने येथील श्री मुकुंदराज स्वामी मंदिर व श्री रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे रखडली असून बीड येथील विभागीय वन अधिकारी गरकल साहेब, आपल्यात हिम्मत असेल तर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे अडवण्या पेक्षा आपल्या हद्दीत अतिक्रमित केलेल्या वान नदी पात्रातील जमिनीवर सुरू असलेल्या दारूच्या भट्ट्या बंद करून मर्दांनगी दाखवावी
अशी प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत.
केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरात व परिसरात नगरोथान योजने अंतर्गत कोटयावधी रुपयांची रस्त्याची कामे सुरू असून याच योजने मधून श्री योगेश्वरी देवी मंदिर ते श्री मुकुंदराज स्वामी मंदिर या रस्त्याचे काम सुरू आहे. हाच रस्ता पुढे येल्डा, चिचखंडी मार्गे परळी- बीड रोडवरील सिरसाळा या ठिकाणी निघतो. या रस्त्याचा काही भाग हा वनविभागाच्या क्षेत्रा मधून जात असल्या कारणाने वनविभागाच्या अधिकाऱ्या कडुन रस्त्याच्या कामात मोठा व्यत्यय निर्माण केला जात आहे. तोच प्रकार दासोपंत समाधी स्थळा पासून श्री क्षेत्र रेणुका देवी मंदिर स्थळा कडे जाणाऱ्या आणि अंबाजोगाई शहरातील रविवार पेठेकडुन श्री क्षेत्र रेणुका देवी मंदिरा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबत घडत असुन या दोन्ही रस्त्याचा काही भाग वनपरिक्षेत्रात येत असल्याने वन विभागाचे विभागीय वन अधिकारी गरकल व त्यांच्या अधिपत्या खाली कार्यरत असलेल्या वनपाल शिंगटे मॅडम या मोठा अडसर निर्माण करून या रस्त्याच्या कामात व्यत्यय निर्माण करत आसल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक या दोन्ही देवस्थानला वनपरिक्षेत्रा मधून जे रस्ते गेलेले आहेत त्या रस्त्याचे या पूर्वी 5 ते 6 वेळा डांबरीकरण करण्यात आलेले आहे आणि हे रस्ते खराब झाल्या कारणाने आहे त्याच भागात नव्याने दुरुस्ती रुपात बनवण्यात येणार असतानाही अधिकारी रस्ता कामात अडथळा निर्माण करत आहेत.
या शिवाय या दोन्ही देवस्थान कडे जाणाऱ्या तिन्ही रस्त्यावर हिंदु व मुस्लिम गवळी समाजाचे अतिक्रमण असून हे अतिक्रमण धारक ही आपले अतिक्रमण काढण्यास तयार नाहीत त्यामुळे हा रस्ता करण्यास कंत्राटदार कंपनीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनीला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे.
वनविभाग अधिकारी व अतिक्रमण धारक यांच्या या अडेलतट्टू भूमिके मुळे भाविकात तीव्र संतापाची लाट उसळली असून बीड येथील विभागीय वन अधिकारी गरकल साहेब, आपल्यात हिम्मत असेल तर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे अडवण्या पेक्षा
परळी वनपरिक्षेत्राच्या मालकीच्या जमिनी मध्ये सुरू असलेली अतिक्रमणे, गौण खनिजाची चोरी रोखण्यात आणि
वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमित केलेल्या वान नदी पात्रातील जमिनी आणि या जमिनीवर सुरू असलेल्या दारूच्या भट्ट्या बंद करून मर्दांनगी दाखवावी अशी प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत.
