*सर्व सामान्य व्यापाऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात अग्रेसर असलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न*
अंबाजोगाई/प्रतिनिधी
सर्व सामान्य व्यापाऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात अग्रेसर असलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्व.विलासराव देशमुख सभागृह नगर परिषद अंबाजोगाई या ठिकाणी पार पडली.
पतसंस्थेने मागील 20 वर्षात केलेले कार्य हे आकाशाला गवसणी घालणारे असून ही पतसंस्था म्हणजे अंबानगरीचे भूषण असलयाची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख पाहून मान्यवरांनी कौतुक आणिगौरव केला.
20 व्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील अमीर ए जमात शेख फरकुंदअली हबीबअली, अंबाजोगाई येथील पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार, युवा उद्योजक व लातूर हार्डवेअर चे मालक मुजाहेद आयुब खुरेशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बळीराम जोगदंड, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी क़ुरआन पठण करण्यात आले तसेच मान्यवरांचा स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना बळीराम जोगदंड म्हणाले की, या पतसंस्थेने अंबाजोगाई शहरात व तालुक्यात लौकिक प्राप्त केला आहे. गेल्या 20 वर्षामध्ये गरुडझेप घेवून जो बँकेच्या दारात जावू शकत नाही किंवा ज्याची पत आणि प्रतिष्ठा नाही अशानां पत व प्रतिष्ठा निर्माण करुन देण्याचे काम अलखैर पतसंस्थेने केले आहे. शेख उमर फारुक सर व या पतसस्थेची वाटचाल आपल्या समोरची आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाढचाल करत ईथपर्यंत वाटचाल राहिलेली आहे. सातत्याने सर्व सामान्यांचा विकास व त्यांची प्रगती करण्याची भुमिका पतसस्थेच्या वतीने घेण्यात आलेली आहे. संकटामध्ये साथ देणारे पाहिजेत म्हणून या पतसंस्थेने एक कुटूब म्हणून माणसे जपली आहेत जवळपास 2200 सभासद संख्या असलेली आणि सामान्य माणसाला मोठी करणारी ही पतसंस्था नक्कीच वेगळी असल्याचे जोगदंड म्हणाले तर युवा उद्योजक मुजाहेद खुरेशी यांनीही पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करुन अंबाजोगाई शहरात आपण दाखल झाल्यानंतर एक विश्वास निर्माण करण्याचे काम या पतसंस्थेने केले आहे. उद्योगाच्या निमित्ताने आम्ही शहारात दाखल झालो या ठिकाणी आल्यानंतर फार मोठे मानसिक पाठबळ देण्याची भुमिका चेअरमन शेख उमर फारुक यांनी घेतली आणि निभावलीसुद्धा आज लातूर हार्डवेअर हे अंबाजोगाई तालुक्यातील विश्वासाचे ब्रँड बनले आहे. तर मधुकर सुवर्णकार यांनीसुध्दा पतसंस्थेच्या प्रगतीचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या पतसंस्थेचे आहवाल वाचन सचिव शेख तालेब चाऊस यांनी केले तर उपाध्यक्ष मोहम्मद मुजम्मील खतीब यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेवून पतसंस्थेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी चेअरमन शेख उमर फारुक यांनी उपस्थितांशी संवाद साधून पतसंस्था हा आता आपला परिवार झाला असून गेल्या विस वर्षाची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी राहिलेली आहे. या वीस वर्षाच्या कालखंडात अनेकांची मदत, अनेकांचे सहकार्य, पाठबळ मिळाल्यामुळे हा वीस वर्षाचा प्रवास अत्ताच कुटे सुरु झाल्याचा भास होतो. पतसंस्थेचे 2164 सभासद असून आज संस्थेकडे 1 कोटी 21 लाख 17 हजार 716 एवढे भांडवल आहे, तरम 10 लाखा 14 हजार रुपये इतकी गंगाजळी आहे. हसना कर्जाच्या माध्यमातून 1 कोटी 95 लाख रुपये कर्ज, अल्पमुदत व्यवसाय कर्ज 72 लाख 35 हजार, वाहन व संगणक तारण मुराबा कर्ज 2 कोटी 14 लाख, होम अप्लायन्स मुराबा कर्ज 13 लाख 81 हजार आणि यंत्र तारण मुराबा कर्ज 7 लाख 66 हजार असे एकूण 5 कोटी 2 लाख 82 हजार 550 रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे तर आज पतसंस्थेकडे 5 कोटी 82 लाख 90 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. ही पतसंस्था म्हणजे व्यावसायिक दुकान नाही तर मानसाने माणसाच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी चालविलेला स्नेहभाव असल्याचे चेअरमन शेख उमर फारुक यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष शेख रहिमभाई, यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष शेख नबी सेठ, माजी नगरसेवक बबलू सिद्दीकी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शेख रिजवान संचालक अलखैर यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख मुजाहेद सर संचालक अलखैर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता मौलाना शेख अकबर इशाती यांच्या दुआ ने झाली. या सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, हितचिंतक, स्नेहीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
