अंबाजोगाई

*नवरात्र उत्सवा निमित्य रेणुकादेवी व मुळजोगाई देवस्थान अंबाजोगाई येथे 03 ते 16 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन*

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवा निमित्य श्री रेणुकादेवी व श्री मुळजोगाई देवस्थान, अंबाजोगाई येथे 03 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान अखंड हरिनाम सोहळ्या निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक व पुजारी श्री. दत्तात्रय अंबेकर व उत्सवाचे चालक नानाश्री यादव यांनी दिली आहे.
कै. मुकुंदअप्पा यादव कै. शामलाल मोदी, कै. शिवाजीराव अंबेकर, कै. बी. एन. सातपुते, कै. ताराचंद परदेशी यांच्या प्रेरणेने व वै. माधवबुवा शास्त्री, किसन महाराज पवार यांच्या आशिर्वादाने आश्विन शु.1 गुरुवार दि. 03 ऑक्टोबर 2024 रोजी या सोहळ्यास प्रारंभ होणार असुन सकाळी 7 वा श्री योगेश परदेशी यांच्या हस्ते घटस्थापना होईल व श्री विष्णुशेठ बजाज यांच्या हस्ते गाथा पुजनाने या महोत्सवास प्रारंभ होईल. वार्षिक महोत्सवाचे हे 35 वे वर्ष आसुन या महोत्सव काळात सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम ७ ते ८, श्री बाळू औसेकर यांचा सप्तशितीपाठ, ८ ते ९ अभिषेक, ९ ते १२ गाथ्यावरील भजन, ११ ते १ हरिकिर्तन, सायं. ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ७ आरती या प्रमाणे दैनंदिन कार्यक्रम होणार असून या उत्सवात श्री.ह.भ.प. बाळासाहेब महाराज कुलकर्णी, श्री.ह.भ.प. विकास महाराज गडदे, श्री.ह.भ.प. गुरुवर्य अच्युत महाराज जोशी, ह भ प अमोल महाराज गोरे सोनपेठकर, ह.भ.प. डॉ. पांडुरंग महाराज तिडके, श्री.ह.भ.प. डॉ. नाथराव महाराज गरजाळे, श्री.ह.भ.प. शिवाजी महाराज ठोंबरे, श्री.ह.भ.प. गोविंद महाराज सुकरे की ना वारकरी संस्था, अंबाजोगाई), ह भ प पांडुरंग महाराज कोकाट नांदगाव, ह भ प प्रमोद महाराज आव्हाड, श्री.ह.भ.प.गजानन महाराज सुवर्णकार घाटनांदूर, श्री. ह. भ. प. श्रीकृष्ण महाराज चवार, श्री. ह. भ. प. प्रभाकर महाराज उगले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आसुन या सप्ताहात दररोज श्री संत सावता महाराज भजनी मंडळ आनंद नगर, दत्त मंदिर भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, खडकपुरा भजनी मंडळ, योगायोग भजनी मंडळ, मध्यवर्ती हनुमान भजनी मंडळ, दक्षिणमुखी भजनी मंडळ हजेरी लावणार आहे.

दि. 11 ऑक्टोबर 2024 शुक्रवार रोजी सकाळी 10 वा. अशोक मोदी यांच्या हस्ते होम-हवन होवून दुपारी 1 वाजता पुर्णाहुती पडेल व दुपारी ४ वा मा. तहसिलदार श्री विलास तरंगे साहेब यांच्या हस्ते श्री रेणुका देवी पालखीची आरती व मा. नगराध्यक्ष, अंबाजोगाई यांच्या हस्ते श्री मूळजोगाई देवीची आरती होऊन श्री रेणुका देवीच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल व गावाची परिक्रमा झाल्या नंतर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या हस्ते मंदिर स्थळी आरती होऊन पालखी सोहळ्याची सांगता होईल.

आश्विन शु. 15 बुुुधवार 16 ऑक्टोबर रोजी श्री अरुण रामकृष्ण काळे यांच्या हस्ते पुजन व
श्री.ह.भ.प. गुरुवर्य किसन महाराज पवार यांचे काल्याचे किर्तन होईल. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत स्थानिक आराधी मेळा होऊन या सोहळ्याची सांगता होईल.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी
अशोक मोदी, मनोज मोदी, सितेंद्र सातपुते, रामेश्वर रांदड, मनोज जाधव, योगेश परदेशी, प्रमोद पाटील, सौ शामल अंबेकर, श्री. आमोल घोडके, श्री. राज कुडके, गणेश अंबेकर, प्रतिक्षा अंबेकर, प्रांजली अंबेकर, परमेश्वर दोनगहु, राहुल मोदी यांच्या सह असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!