*आंबासाखर कारखान्यात रमेशराव आडसकर व दत्ता आबा पाटील दोन विरोधक एकत्रित आल्याने कारखाना चालू होण्या बाबत 47 व्या वार्षिक सर्व साधारण सभेत ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या आशा पल्लवित*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
आंबासाखर कारखान्यात रमेशराव आडसकर व दत्ता आबा पाटील हे दोन विरोधक एकत्रित आल्याने आणि
या वर्षी मांजरा धरण 100 टक्के भरल्याने कारखाना चालू होण्या बाबत
आंबाच्या 47 व्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये या दोन्ही नेत्यांनी सूचक वक्तव्य केल्याने कारखाण्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आंबा साखर कारखाण्याची 47 वी वार्षिक सर्व साधारण सभा कारखाना परिसरात सर्व ठरावाला मंजुरी देत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वेळी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह अंकुशराव इंगळे, अनंत लोमटे, विलास काका सोनवणे, अॅड प्रमोद चंद्रकांतराव जाधव, ऋषीकेश प्रकाशराव आडसकर, संभाजी बब्रुवान इंगळे, लक्ष्मिकांत महादेवराव लाड, आशोक भगवानराव गायकवाड, गोविंद बालासाहेब देशमुख, राजाभाऊ भगवानराव औताडे, विजय रामराव शिनगारे, बाळासाहेब यशवंत सोळंके, मधुकर विश्वंभर शेरेकर, अनिल शिवाजीराव किर्दत, जिवन रामराव कदम, लालासाहेब बाळासाहेब जगताप, अनंत भगवानराव कातळे,
विठ्ठल संभासाहेब देशमुख, श्री. शशिकांत गोपिनाथराव लोमटे, मिनाज युसुफखॉ पठाण, रमाकांत बाळासाहेब पिंगळे, श्रीमती भागिथी बंकटराव साखरे, श्रीमती वच्छलाबाई वासुदेव शिंदे, एस.बी.साखरे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड आधी मान्यवर, संचालक व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना चेअरमन रमेश आडसकर म्हणाले की, 47 वर्षा पूर्वी स्व बाबुराव आडसकर, स्व डी एन पाटील, स्व आबासाहेब चव्हाण, स्व श्रीरंगराव मोरे, स्व भगवानराव लोमटे यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या हितासत्व त्यांना न्याय देण्यासाठी आंबा कारखाना सुरू केला. मध्यंतरीच्या काळात कारखाण्याला घरघर लागली. शासनाने 3 वेळा कारखाना लिक्विडेशन मध्ये काढला. मात्र तो तिन्ही वेळा वाचवण्याचा प्रयत्न केला. कालच्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन कारखाना पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न चालवला आहे. हा कारखाना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस व मा ना अजितदादा पवार, कृषिमंत्री मा ना धनंजय मुंडे, मा ना हर्षवर्धन पाटील, मा आ पंकजाताई मुंडे यांनी मदत केली.
मध्यंतरी कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला होता मात्र तो पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँके नंतर एन सी डी सी ने 80 कोटीचे कर्ज दिल्याने परत कारखाना चांगला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या पूर्वी करखाण्याचे कामगार, सभासद, ऊस उत्पादक यांना घेऊन कारखाना जिवंत ठेवण्याचे काम केलेले आहे. शासनाने जे कर्ज मंजूर केल आहे ते जुने जे कारखान्याचे कर्ज होते ते भरण्यासाठी मंजूर झाले आहे, ते कर्ज भरल्या नंतर चांगल्या कंपनीला या ठिकाणी बोलावून कारखान्याची जी जुनी मशिनरी आहे ती कशी अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत करता येईल या साठी प्रयत्न करणार आहोत. काही मशिनरी नवीन आणावी लागणार आहे. हे कर्ज पुरत नाही तरी पण सुरवात चांगली झाली आहे. जुन्या लोकांनी उभा केलेली वस्तू टिकवण्यासाठी आम्ही या पुढे निश्चित बांधील आहोत.
या वेळी बोलताना व्हाईस चेअरमन दत्तात्रय आबा पाटील म्हणाले की, या कारखान्याची गाळप क्षमता सर्वाधिक असताना तो भाड्याने देण्याची वेळ यावी हे दुर्देव असून तो आपल्या स्वबळावर चालवण्या साठी आपल्या कडे आलेला आहे, ही फार मोठी संधी चालून आलेली आहे. योगायोगाने या वर्षी मांजरा धरण 100 टक्के भरल्याने पुढचे 3 वर्ष तरी ऊस आपल्याला कमी पडणार नाही. त्या मुळे आंबा कारखान्याला चांगले दिवस आलेले आहेत असं म्हंटल तर वावग ठरणार नाही. हा कारखाना योग्य रीतीने चालवण्या साठी आमची व रमेश आडसकर साहेबांची नॅचरल युती झाली कारण या दोघांची गरज या करखान्याला होती. या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून दिल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत. येणाऱ्या काळात कारखान्याला जरी रंगरंगोटी दिसली नाही तरी शेतकऱ्यांच्या उसाला इतर करखाण्याच्या बरोबरीत किंबहुना त्याहून अधिक भाव देण्यास आम्ही कटिबद्ध राहू. कर्मचाऱ्यांची देणे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून त्यांचा दरमहिण्याला पगार करून त्यांच्या घरात आर्थिक स्थेर्य कसे निर्माण होईल या साठी प्रयत्न करू. हा कारखाना सुरू करण्याची शेवटची संधी आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे या पूढे कारखान्यातुन कुठलाही अनागोंदी कारभार होणार नाही कोणाला करू दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी बोलताना दिली. यावेळी अंबानी सर्व साधारण सभेच्या बॅनर वर स्व बाबुराव आडसकर आणि स्व डी एन पाटील यांचे फोटो असल्या बद्दल मनोमन आनंद व्यक्त केला.
या वेळी कार्यकारी संचालक डी एन मरकड यांनी वार्षिक सर्व साधारण सभेच्या सुचनेचे वाचन केले तर सभेचे सुत्रसंचलन रवी देशमुख यांनी केले.
