*मा शरदचंद्र पवार साहेबानी विधान सभेची उमेदवारी देतांना चलत्या घोड्यावर डाव लावनाराला उमेदवारी देऊन फसगत करून घेण्यापेक्षा बीड मधून आ संदीप क्षीरसागर व केज मधून माजी आ पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी द्यायला हवी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
बीड व केज मतदार संघा मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन निवडणूक लढवण्यास आमदारकीच्या स्वप्नात रंगलेले जवळपास 8 ते 10 जण हातात तुतारी घेण्यास इच्छुक असले तरी शरदचंद्र पवार साहेबानी विधान सभा निवडणुकीत उमेदवारी देतांना चलत्या घोड्यावर डाव लावनाराला उमेदवारी देऊन फसगत करून घेण्यापेक्षा बीड मधून आ संदीप क्षीरसागर व केज मधून माजी आ पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी देऊन निष्ठेचे फळ द्यायला हवे अशीं प्रतिक्रिया मतदारा मधून व्यक्त होत आहे.
मागील अडीच वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेले 2 गट यातून उदयाला आलेले किळसवाणे राजकारण आणि यातून राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीच्या नेत्याला मिळालेली सहानभूती व यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश संपूर्ण देशाने पाहिले.
याचाच दुसरा अंक विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आता राज्य आणि देश पाहनार असुन विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे राज्य भरातील सर्वच मतदार संघा मधून उमेदवारी मागण्यांसाठी इच्छुकांची इनकमिंग मोठ्या प्रमानावर दिसते आहे.
राज्य भरातील इतर मतदार संघा प्रमाणे बीड व केज मतदार संघाची परिस्थिती असून या दोन्ही मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र या दोन्ही मतदार संघात उमेदवारी देते वेळी
शरद पवार साहेबांना पक्ष फुटीच्या वेळी बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर व केज मतदार संघातून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी जी खंबीर पणे पाठीशी उभा राहून साथ दिली आणि लोकसभा निवडणुकीत या दोघांनी खा बजरंग बप्पा सोनवणे यांना मताधिक्य मिळवून देण्यात जे अहोरात्र परिश्रम घेतले त्या पक्ष निष्ठेचे फळ म्हणून शरद पवार साहेबांनी विधान सभा निवडणुकीत उमेदवारी देतांना चलत्या घोड्यावर डाव लावनाराला उमेदवारी देऊन फसगत करून घेण्यापेक्षा बीड मधून संदीप क्षीरसागर आणि केज मधून पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी द्यायला हवी अशी प्रतिक्रिया मतदारा मधून व्यक्त होत आहे.
Post Views: 342