अंबाजोगाई

*फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-

अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयात दि २६ सप्टेंबर गुरुवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना अतंर्गत आरोग्य तपासणी शिबीर हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात धनवंतरी व माता सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिरासाठी अंबाजोगाई शहरातील नामांकित डॉक्टर प्राजक्ता बर्गे या उपस्थित होत्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तरके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी करणे खूप महत्त्वाचे व गरजेचे असल्याचे सांगितले. वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणी केल्यामुळे कोणतीही समस्या ओळखता येवून त्यावर तात्काळ उपचार करण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य तपासणी नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्राचार्य डॉ संतोष तरके यांनी सांगितले.
या आरोग्य तपासणी शिबिरात क्रोनिक आजार असलेल्या नागरिकांनी तसेच विशिष्ट वयोमानाच्या नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. प्राजक्ता बरगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यां व नागरिकांना सांगितले. लहान मुलांसाठी देखील आरोग्य तपासणीची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवता येते आणि त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करता येते. मुलांच्या आरोग्य तपासणी मुळे त्यांच्या वाढीचा आढावा, निदान, टीकाकरण, मानसिक आरोग्य, जीवनशैलीची माहिती उपलब्ध करता येते. त्यामुळे मुलांसाठी आरोग्य तपासणी नियमितपणे करणे अत्यंत आवश्यक आहे कारण यामुळे त्यांच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेता येते आणि त्यांना निरोगी आणि खुशाल जीवन जगण्यास मदत होईल असे मत डॉ प्राजक्ता बर्गे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालया मध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्या मध्ये पल्स रेट, वजन, हीमोग्लोबिन, ऑक्सीजन, सीबीसी, ब्लड ग्रुप, एच बी आणि बीपी च्या तपासणी घेण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तरके यांच्यासह सर्व प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!