*परशुराम अर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेत प्रयत्नशील राहून केला पाठपुरावा केल्या बद्दल ब्राम्हण ऐक्य परिषदेच्या वतीने आ नमिता मुंदडा यांचा सत्कार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महायुती सरकारने कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचा घोषण केली या कार्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करून पाठपुरावा केल्याबद्दल केज विधानसभेच्या आ.सौ. नमिता मुंदडा यांचा ब्राह्मण ऐक्य परिषद अंबाजोगाईच्या वतीने गौरव करण्यात आला. व्यासपीठावर राष्ट्रसेविका समितीच्या पदाधिकारी शरयु हेबाळकर,भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, ब्राम्हण सभेचे अध्यक्ष अनिरुद्ध चौसाळकर,माजी नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,पत्रकार अविनाश मुडेगांवकर, डॉ.सुधीर धर्मपात्रे, संगीता काटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. मुंदडा म्हणाल्या की, ब्राम्हण समाज हा इतर समाजाला मार्गदर्शन करतो पण या समाजाने आजतागायत स्वतःला काही मागितले नाही गेल्या काही वर्षापासून परशुराम अर्थिक विकास महामंडळ व्हावे ही जुनी मागणी होती महायुती सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेची घोषणा केली ही समाजासाठी आनंदाची बाब असून या बाबत नागपुरच्या अधिवेशनात याबाबत मी महामंडळ स्थापन करण्या बाबत राज्य शासनाने प्रयत्न करावेत असे पत्र देऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यास मुर्त स्वरूप प्राप्त झाले याचा मला अभिमान वाटतो असे मत आ.नमिता मुदंडा यांनी व्यक्त केले यावेळी रामभाऊ कुलकर्णी म्हणाले की , महामंडळ स्थापन होणे काळाची गरज होती ब्राम्हण समाजातील बांधवांना महामंडळाद्वारे बीन व्याजी कर्ज पुरवठा करावा जेणे करून ब्राम्हण समाजातील युवक व्यवसायात उतरून उपजिविका साधतील सरकारने ब्राम्हण समाजासाठी संरक्षण कायदा लागु करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले यावेळी अनिरुद्ध चौसाळकर , शरयु हेबाळकर मकरंद सोनेसांगवीकर यांनीही मनोगत व्यक्त केले
प्रास्तविकात डॉ.अतुल देशपांडे यांनी सांगितले की पुढील काळात ब्राम्हण समाजासाठी विविध योजना राबविल्या जाव्यात तसेच दासोपंत समाधी स्थळाचा जिर्णोध्दार व विकासात्मक काम व्हावीत. सर्वज्ञ दासोपंत पाठशाळेच्या वतीने आशिर्वचन मंत्र पठण करण्यात आले.
प्रज्ञा देशपांडे यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.यावेळी डॉ. गोपाळ चौसाळकर, निवृत्त अभियंता शरद देशपांडे, राहूल देशपांडे , पद्माकर सेलमोकर उपेंद्र गोस्वामी, आनंद देशपांडे , अरूण हरबाजी,सतिश धारूरकर,वरद मुडेगांवकर,राजेश गोस्वामी, शैलेष गोस्वामी,अनुजा देशपांडे,गिताजंली कुलकर्णी,जया मुडेगांवकर,शालिनी गोस्वामी यांच्यासह ब्राम्हण ऐक्य परिषदेचे सदस्य,इतर समाज बांधव उपस्थित होते.
