अंबाजोगाई

*स्त्री शक्ती संवाद दौऱ्यानिमित्य उद्या मा. सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात मेळावा*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
     स्त्री शक्ती संवाद दौऱ्यानिमित्त अंबाजोगाई येथे २७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘शिवसेना उपनेत्या मा. सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
    होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी निमित्त शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर स्त्रीशक्ती संवाद दौरा आयोजित केलेला आहे. म्हणून २७ सप्टेंबर २०२४ रोज शुक्रवार दुपारी ३ वा. अंबाजोगाई येथे केज विधानसभा व परळी विधानसभेतील महिला व पुरुष शिवसैनिकाचा व गटप्रमुखाचा मेळावा शिवसेना उपनेत्या मा. सुषमाताई अंधारे यांच्यासह उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, बीड संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब, महिला संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी, माजी आमदार लोकसभाप्रमुख सुनिल दादा धांडे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी केज व परळी विधानसभेतील महिला आघाडी युवासेना व शिवसेना पदाधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख श्री. रत्नाकरअप्पा शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीदादा कुलकर्णी, नारायण दादा सातपुते, दिपक मोराळे, तालुका प्रमुख बालासाहेब शेप, अशोक जाधव, भोजराज पालीवाल, महिला आघाडीच्या डॉ. नयनाताई सिरसट, जयश्रीताई पिंपरे, रेखाताई घोबाळेसह शहरप्रमुख अशोक हेडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!