*मांजरा धरणाच्या जलपूजना मध्ये केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी पटकावला पहिला नंबर*
*मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये आ मुंदडा यांच्या हस्ते जलपुजन सोहळा संपन्न*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मांजरा धरणाच्या जलपूजना मध्ये केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई अक्षय मुंदडा यांनी पहिला नंबर पटकावला असून आज सकाळी शेकडो गाड्या सह मांजरा धारणा वर जाऊन मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये आ मुंदडा यांनी जलपुजन केले.
या वेळी आ नमिता मुंदडा म्हणाल्या की, मांजरा धरण 100 टक्के भरल्याने केज मतदार संघ व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा तर गंभीर प्रश्न तर मिटला आहे शिवाय शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यात ही अशाच पद्धतीचा पाऊस काळ रहावा व धरण सतत भरलेले रहावे अशी प्रार्थना त्यांनी या वेळी केली.
या वेळी बोलताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, एखादी लॉटरी लागल्यावर जेवढा माणसाला आनंद व्हावा त्या पेक्षाही मोठा आनंद मांजरा धरण भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेला आहे. तो आनंद अधिकाऱ्यांना व आम्हाला ही तेवढाच झाला असुन मागील 5 वर्ष ही धरण भरल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे. धरण भरल्याने धनेगाव च्या शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र आ नमिता मुंदडा यांनी 2 कोटी रु मंजूर करून हा विजेचा प्रश्न मिटवलेला आहे.
या धरणाच्या मजबुती करणासाठी 20 कोटी आणी शासकीय विश्राम ग्रहाच्या दुरुस्ती साठी 20 कोटी रु आ मुंदडा यांच्या माध्यमातून मंजुर केल्याचे ते म्हणाले. या भागातील रस्त्याचा विषय ही आ मुंदडा यांनी मार्गी लावलेला आसून गावठाण फिडर च्या माध्यमातून गाव आणि शेती वेगळी करण्याच्या कामासाठी 80 कोटी रु मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आ पंकजाताई मुंडे, मा खा प्रीतमताई मुंडे यांच्या सहकार्याने या परिसरा साठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणण्या साठी सतत प्रयत्न सुरू असून सामान्य माणसाचा कॉल आला तर दवाखान्याचा विषय असो, तहसीलचा विषय असो तो मार्गी लावण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजने मध्ये गावागावात जाऊन त्यांना फॉर्म भरण्यास आ मुंदडा यांनी प्रयत्न केले. राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र योजने मधून केज मतदार संघातील 50 हजार 60 वर्षा वरील हिंदू-मुस्लिम वृद्ध व्यक्तीस तिरुपती, अयोध्या, वारानसी, अजमेर या तीर्थ यात्रेस सन्मानाने पाठवण्याची सोय आ नमिता मुंदडा याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
आपल्या कामाच्या सहकार्याने व मतदारांच्या आशीर्वादाने आ नमिता मुंदडा या पुन्हा निवडून येतील हा आत्मविश्वास ही नंदकिशोर मुंदडा यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.
या जल पूजन कार्यक्रमाच्या वेळी मांजरा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पाटील सह अन्य अधिकारी व केज मतदार संघाच्या विविध गावातून नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Post Views: 278