पुणे जिल्हा ना सह बॅंक्स असोसिएशनचा अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस शून्य टक्के एन पी ए पुरस्कार जाहीर*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि पुणे यांच्या वतीने दिला जाणारा २०२३-२४ या वर्षाचा शून्य टक्के एन पी ए पुरस्कार हा अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस जाहीर केल्याचे पत्र नुकतेच बँकेस प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी व मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी दिली आहे.
अंबाजोगाई पिपल्स बँकेस प्राप्त झालेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की आपल्या बँकेने सन २०२३-२४ सालात चांगली कामगिरी करून बँकेचा एन.पी.ए. “शुन्य टक्के” ठेवण्यात यश मिळविले आहे. त्याबद्दल आपल्या बँकेचा “शुन्य टक्के एन.पी.ए.” पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास मा. नामदार मुरलीधर मोहोळ, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली”, मा. दिपक तावरे. भा.प्र.से. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. सतिश मराठे. संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व मा अनिल कवडे भा.प्र.से. (निवृत्त) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे हे उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रम दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी दु.१२.३० वाजता” कै. विजय तेंडुलकर सभागृह” राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनियर कॉलेज अनुराग सोसायटी, सेव्हन वंडर्स ड्रीम पार्कसमोर, शिवदर्शन, पर्वती, पुणे ४११००९ येथे संपन्न होणार आहे.
तेव्हा अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या संचालक मंडळाने या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारावा अशी विनंती पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि पुणे चे अध्यक्ष ऍड सुभाष मोहिते, उपाध्यक्ष ऍड साहेबराव टकले तथा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी केली आहे.अंबाजोगाई पिपल्स को बँकेने मार्च २०२४ अखेर ५५० कोटींचा टप्पा गाठला आहे. मार्च २०२४ अखेर बँकेचे वसूल भागभांडवल हे रू १८ कोटी असून बँकेचा स्वनिधी हा रुपये ४० कोटी २७ लाख असून राखीव निधी हा १३ कोटी ०६ लाख रुपये एवढा आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमास आधीन राहून ग्राहकांना रु.३२७ कोटी ५३ लाख रुपये एवढा कर्ज वितरित केले आहे. त्याचबरोबर मार्च २०२४ अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु २२२ कोटी ८५ लाख एवढी आहे . वर्ष अखेरीस बँकेस करपसच्यात ४ कोटी २० लाखांचा नफा झाला असून त्यामुळे बँकेच्या वतीने सभासदाना ९% लाभांश देखील देण्यात आला आहे. मार्च २०२४ च्या लेखा परीक्षण अहवालात बँकेस “अ” दर्जा प्राप्त झाला आहे. अंबाजोगाई पिपल्स बँक ही अठरा शाखांच्या द्वारे ग्राहकांना सेवा पुरवीत आहे . नुकत्याच आणखी दोन नवीन शाखां रिझर्व्ह बँकेने मान्यतेनुसार अंबाजोगाई (चौसाळकर कॉलनी) व छत्रपती संभाजी नगर (सातारा परिसर) येथे सुरू केल्या आहेत. डिजिटल बँकिंग च्या माध्यमातून UPI, IMPS, RTGS , ATM द्वारे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बँक सदैव प्रयत्नशील असते.
मागील काळात अनेक आर्थिक संस्था डबघाईला येऊन दिवाळखोरी मध्ये निघाल्या. अनेक ठेवीदारांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. मात्र अशाही परिस्थितीत अंबाजोगाई पिपल्स बँक ग्राहक ठेवीदार व सभासदांच्या विश्वासाच्या बळावर आपली आर्थिक वाटचाल करत आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनने अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेस शुन्य टक्के एन पी ए पुरस्कार देण्याचे जाहीर केल्याचे बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रा वसंत चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी सांगितले आहे.
चौकट :- बँकेला मिळालेले यश हे अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार तसेच ग्राहकांच्या अढळ विश्वासाच्या बळावरच असल्याचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले. बॅंकेवर ठेवलेल्या विश्वासाबद्दल सर्वाचे आभार व्यक्त करत मोदींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
