*मनोज दादा जरांगे यांचे उपोषण पुन्हा एकदा स्थगित*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मराठा आरक्षणाच्या लढाई साठी 6 व्या वेळी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे यांनी आपले आमरण उपोषण पुन्हा एकदा 9 व्या दिवशी स्थगित केले आहे.
मराठा समाजास ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे या मागणी साठी मनोजनदादा जरांगे हे मागील दहा दिवसा पासुन अंतरवाली सराटी मध्ये 6 व्या वेळी आमरण उपोषणास बसले होते. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याने त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने चार दिवसा पूर्वी बीड जिल्हा बंदची हाकही देण्यात आली होती. मनोज जरांगे यांना उपोषण स्थळी भेटण्यासाठी मराठवाडयाच्या काना कोपऱ्या मधून लोक अंतरवली सराटी कडे आगेकूच करत होते, पोलिसांनी या आगेकूच करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी रस्ते बंद केले होते.
मागील उपोषणा प्रमाणे यावेळेस शासनाने जरांगे यांच्या उपोषणा कडे गांभीर्याने न पाहिल्याने व शासनाचा प्रतिनिधीही उपोषणा कडे फिरकत नव्हते. त्यांची प्रकृती खालावत जात होती, उपोषण स्थळी आलेल्या महिला पुरुष त्यांना उपोषण सोडण्याची साद घालत होते. अखेर या सर्व चाहत्यांच्या विंतीनला मान देऊन आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले असून त्यांना आता उपचारा साठी छत्रपती संभाजी नगर येथील गेलेक्सि रुग्णालयात भरती करण्या साठी हलवण्यात आले आहे.
