दासोपंत जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मराठी साहित्याचे नवकोट नारायण पासोडीकार सर्वज्ञ दासोपंत यांचा जन्मोत्सव सोहळा येथील दत्त संस्थान थोरले व धाकटे देवघर येथे उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात आला जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त करूणाष्टक, स्तोत्र,मंत्र पुष्पाजंली आदींचे पठण ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत करण्यात आले
दासोपंत सत्संग मंडळाचे कार्याध्यक्ष पत्रकार राहूल देशपांडे यांनी दासोपंतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली दासोपंत रचित भजनांचे गायन करण्यात आले यात दत्त भक्तांनी सहभाग घेतला इतरही विवीध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले
त्याचबरोबर समाधीस्थानावरही रुद्राभिषेक संपन्न झाला सर्व ठिकाणी भक्त गण, परिसरातील नागरीक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .
