अंबाजोगाई

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्य काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेच्या गाण्याच्या धुंदीत लोखंडी रॉडचा झेंडा हाय होल्टेज तारेला लागल्याने 2 तरुनांचा जागीच मृत्युमुखी *पुण्यातील वडगांव शेअरी परिसरातील घटना घडली, सर्व धर्मीय युवकांनी बोध घेण्याची आवश्यकता*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्य काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेच्या गाडीवर उभा राहून डीजेच्या गाण्याच्या  धुंदीत लोखंडी रॉड ला लावलेला झेंडा फिरवत नाचत असताना तो रॉड हाय होल्टेज तारेला लागल्याने 2 तरुण जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना पुण्यातील वडगांव शेअरी परिसरात घडली असून डीजे मुळे घडलेल्या या दुर्देवी घटनेचा सर्व धर्मीय युवकांनी यातून बोध घेण्याची वेळ आली आहे.

     मागील काही वर्षा पासून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद या प्रमुख सणा सह नेत्यांच्या मिरवणुका, महापूरुषांच्या जयंतीच्या मिरवणुका, लग्नातील नवरदेवाची वरात एवढच नाही तर धनदांडग्याच्या औलादीचे वाढ दिवस डीजे (डॉल्बी) लावून साजरा करण्याची स्पर्धा लागलेली आहे. या डीजेच्या आवाजाने ह्रदय विकाराच्या झटक्याने आज तागायत हजारो लोकांचा दुर्दर्वी रित्या मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
     अंबाजोगाई शहरासह राज्यभरात या वर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका मध्ये डीजे लावण्याची स्पर्धा होती डीजेच्या कर्कश्य आवाजाने पुणे परिसरातच तीन जणांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने दुर्दवी मृत्यू झाला. डीजे सोबतच्या एल ई डी लाईट मुळे 200 लोकांचे डोळे गेले.
     गणेशोत्सवा प्रमाणेच मोहंमद पैगंबर जयंती निमित्य अंबाजोगाई सह राज्यभरात काढल्या गेलेल्या मिरवणुकी मध्ये डीजेचा कर्कश्य आवाज घुमला गेला.
    वास्तविक सुप्रीम कोर्टाने डीजेचा आवाज किती असावा, मंदिर मज्जीद वर लावलेल्या भोंग्याच्या आवाजाची मर्यादा किती असाव्यात याच्या गाईड लाईन ठरवून दिलेल्या आहेत. मात्र याची अंमलबजावणी कोण करतो? राजकीय लोकांना याचे काही एक देणे घेणे राहिलेले नाही, उलट राजकीय लोकांच्या देणग्या मुळे डीजे संस्कृतीला दिवसेंदिवस खतपाणी मिळत आहे. पोलीस प्रशासना कडे मनुष्यबळ कमी असल्याने आशा डिजेवर, भोंग्यावर कार्यवाही केल्या जात नाही.
     या डीजे चा दुसरा एक दुष्परीनाम मागील काही वर्षा पासून पहावयास मिळाला आहे तो म्हणजे ट्रॅक्टर, टेम्पोच्या वरती डीजे लावण्यात येतो, त्यावर मुले बसतात ते केवळ बसत नाहीत तर त्यांचे माकड चाळे सुरू असतात. मागील वर्षीही एका मिरवणुकी मध्ये डिजेवर बसलेल्या मुलांच्या जवळील लोखंडी रॉड वरून गेलेल्या हाय होल्टेज तारेला लागल्याने 4 जणांचा दुर्देवी रित्या मृत्यू झाला होता.
     हाच दुर्देवी प्रकार काल पुण्यातील वडगाव शेअरी या ठिकाणी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्य काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडला. मिरवणुकी मधील डीजेच्या गाडीवर उभा राहून डीजेच्या गाण्याच्या  धुंदीत लोखंडी रॉड ला लावलेला झेंडा फिरवत नाचत असताना तो रॉड हाय होल्टेज तारेला लागल्याने अभय वाघमारे व झकारिया बिलाल शेख हे
2 तरुण जागीच मृत्युमुखी पडले.
    डीजेच्या आवाजाने होत असलेले ह्रदय विकाराचे मृत्यू, आणि डीजे वर नाचत हाय होल्टेज तारेला चिटकून होणारे मृत्यू याचे आत्मपरीक्षण करण्याची व त्यातून चांगला बोध घेण्याची वेळ धर्मीय युवकावर आलेली आहे हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!