भारतीय सण उत्सवामुळे देशाच्या संस्कृतीबरोबरच हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहिले आहे- राजकिशोर मोदी
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- भारतीय सण व उत्सवामुळे देशाच्या संस्कृती बरोबरच हिंदू मुलींम ऐक्य अबाधित राहिले असल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते आज ईद ए मिलादुनबी निमित्ताने निघालेल्या मिरवणुकी (जुलूस) निमित्ताने मुस्लिम बांधवाना भेटून शुभेच्छा देतांना बोलत होते. आज ईद निमित्ताने मुस्लिम बांधवानी नमाज पठणानंतर जुलूस चे आयोजन केले होते. यावेळी सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देत त्यांच्या आनंद व उत्सवात राजकिशोर मोदी सहभागी झाले होते. याप्रसंगी त्यांच्या सोबत महादेव आदमाने, हाजी महमूद, खालेद चाऊस,मनोज लखेरा, धम्मा सरवदे, दिनेश भराडीया, सुनील वाघळकर ,जावेद गवळी , महेबूब गवळी, अंकुश हेडे, शाकेर काझी, अकबर पठाण, वजीर शेख,आकाश कऱ्हाड, अस्लम शेख,शरद काळे, रफिक गवळी, दत्ता सरवदे, खलील जाफरी, रोहन कुरे, तौफिक सिद्दीकी यांच्यासह आदीजण सहभागी होते.
ईद ए मिलादुनबी म्हनेजच ईद मिलाद हा सण मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस. हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्म व धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी जग पिंजून काढले. इस्लाम धर्माची शिकवण देतांना मोहम्मद पैगंबर यांनी तमाम इस्लाम बांधवाना आपल्या धर्माचा सन्मान करा व ते करताना इतर धर्मियांचा देखील आदर राखण्यासाठीची शिकवण दिली. आज याच शिकवणीवर देशातील मुस्लिम बांधव चालतांना दिसून येत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
गणपती मुळे यावर्षी ईद रविवारी दि 22 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. या इदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठा जुलूस काढण्यात आला होता. या जुलूस मध्ये हजारो मुस्लिम तरुण युवक, जेष्ठ सहभागी झाले होते. या जुलूस मधील सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत राजकिशोर मोदी यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजात मोठया प्रमाणावर उत्साह दिसून आला .
