रायमोहा येथे अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस स्था.गु.शा.च्या पथकाने केले जेरबंद
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पाटोदा तालुक्यातील रायमोहा येथे अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस स्था.गु.शा.च्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्या कडुन एक गावठी गट्टा किंमती 41000/- रु मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
मा.पोलीस अधीक्षक, बीड यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरुन पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांनी अवैध धंध्यावर केसेस करण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना अवैध धंद्दे व अवैध वाळु वाहतूक विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन दिनांक 21/09/2024 रोजी स्थागुशा येथील पोना/सोमनाथ गायकवाड व स्टाफ हे पाटोदा तालुक्यात गस्त घालत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती आधारे रायमोह ता.पाटोदा येथे इसम नामे बबर रशीद पठाण रा.रायमोह यांचेकडे गावठी कट्टा असल्याची बातमी मिळाली, तेव्हा स्थागुशा पथकास श्री. उस्मान शेख पो.नि.स्थागुशा बीड यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थागुशा पथक लागलीच रवाना होवुन मौजे रायमोह येथे इसमाचा शोध घेवुन छापा टाकला असता इसम नामे आसेफ उर्फ बबर रशीद पठाण, वय 32 वर्षे, रा.रायमोह ता.पाटोदा याचे कंबरेला एक गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवत काडतुस किमती 41000/- रु चा मुद्देमाल बेकायदेशीरपणे मिळुन आलेला आहे. अवैध गावठी कट्टा व आरोपीस स्थागुशा पथकाने पुढील कारवाई साठी पो.स्टे.पाटोदा यांचे ताब्यात देले असून आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोह/मारुती कांबळे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, पाअं / अर्जुन यादव, नारायण कोरडे यांनी केलेली आहे.
