डॉ.एकनाथ शेळके व श्री.धर्मराज थोरात यांना कै बाबुराव आडसकर जिवन गौरव पुरस्कार धारूर येथे उद्या रमेशराव आडसकर यांच्या हस्ते पुरस्काराचे होणार वितरण
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.पत संस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षी आरोग्य क्षेत्रातुन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डॉ.एकनाथ शेळके यांची निवड झालेली आहे.
आदर्श शेतकरी धर्मराज थोरात यांची शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि.22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गरड मंगल कार्यालय किल्ले धारूर येथे होणार आहे.
या पुरस्काराचे वितरण रमेशराव आडसकर यांच्या हस्ते व डॉ.स्वरुपसिंह हजारी, शेषेराव फावडे , अर्जुन गायकवाड,सुमंतराव डुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती चेअरमन सुरेश शिनगारे ,व्हाईस चेअरमन प्रा.सुरेश कांबळे, संचालक प्राचार्य डॉ.माधवराव फावडे,सचिव बालासाहेब घुगे,खजिनदार दत्तु यादव व इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.
