उमेश मोहिते, रचना स्वामी आणि अलीम आजीम यांना अंबाजोगाई मसापचे पुरस्कार जाहीर; साहित्य संमेलनात होणार वितरण
अंबाजोगाई (प्रतिनिधी)– अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या दिवंगत अध्यक्षांच्या नांवे दर दोन वर्षाने होणा-या अंबाजोगाई साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्राचार्या डॉ. शैला लोहिया, मंदाताई देशमुख व प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर यांच्या नावे अनुक्रमे लेखिका, कथाकार व शिक्षक लेखकांची निवड केली जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी उमेश मोहीते, एस. रचना आणि अलीम आजीम यांची निवड करण्यात आली आहे. मसाप आंबाजोगाईच्या दगडू लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत यंदाचे पुरस्कार ठरविण्यात आले असून या पुरस्काराचे वितरण ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्कारांमध्ये प्राचार्या डॉ. शैला लोहिया लेखिका पुरस्कार सौ. रचना स्वामी (आंबाजोगाई-पाथर्डी) यांना मंदा देशमुख कथा लेखक पुरस्कार- उमेश मोहिते (आंबाजोगाई)यांना तर प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर शिक्षक लेखक पुरस्कार अलीम अजीम शेख (आंबाजोगाई-ठाणे) यांना जाहीर करण्यात आले आहेत. मसाप शाखा अंबाजोगाई घ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हे पुरस्कार निश्चित करण्यात आले. या बैठकीला सचिव गोरख शेंद्रे, कोषाध्यक्ष शैलजा बरुरे, ११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मार्गदर्शक अमर हबीब, रेखा देशमुख, तिलोत्तमा पतकराव आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे वितरण डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात केले जाईल, असे मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी सांगितले.
