मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
कुठलाही अनुचित प्रकार न होता हा बंद शांततेत पाडल्या मुळे व्यापाऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास
अंबाजोगाई (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या लढाई साठी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला, कुठलाही अनुचित प्रकार न होता हा बंद शांततेत पाडल्या मुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मराठा समाजास ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे या साठी मागील 1 वर्षा पासून मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वा खाली नेते वगळता संपूर्ण मराठा समाज एकवठला असून या साठी मोर्चा, धरणे, बंद, उपोषण ही आंदोलनात्मक पावले उचलली जात आहेत. अंतरवली सराटी मधून सुरू झालेला हा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असून मनोजनदादा जरांगे हे मागील चार दिवसा पासुन अंतरवाली सराटी मध्ये चौथ्यांदा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याने त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पाठिंबा देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनेही अंबाजोगाई बंद ची हाक देण्यात आली होती.
या बंदमध्ये शहरातील सर्वच भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने 100 टक्के ठेऊन पाठिंबा दर्शवला. सकल मराठा समाजाच्या वतीने दीपक भेय्या शिंदे, अंबाजोगाईचे जरांगे पाटील निलेश जोगदंड, रोहन लोमटे, रवी लोमटे, राहुल लोमटे, महेश शिंदे, इंद्रजित मोरे, विशाल पवार, राहुल सुरवसे, गणेश औताडे, अविनाश लोमटे, आकाश भिसे, आकाश माने, श्रीकांत धायगुडे, पप्पू काकडे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. हा बंद यशस्वी रित्या शांततेत पार पडल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
