परराज्यातून घटनांदूर येथे रेल्वेने आलेला 12 लाख 77 हजार 900-/ रुपये कींमतीचा गांजा पकडला
पोलीस अधीक्षक मा.अविनाश बारगळ व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या पथकाची कार्यवाही
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षक मा.अविनाश बारगळ व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखालील कार्यरत पथकाने पर राज्यातून रेल्वेने घाटनांदुर येथे आलेला 12 लाख 77 हजार 900-/ रुपये कींमतीचा गांजा मुद्देमालासह पकडल्याने खळबळ उडाली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक 19//9/2024 रोजी गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांनी त्यांचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर तसेच पोलीस निरीक्षक श्री पडवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे व सपोनि कवडे यांची संयुक्त टीम तयार करून योग्य त्या साहित्यांशी घाटनांदुर येथे जाऊन गांजा वर रेड करण्यास सांगितले. त्या अनुषंगाने हे पथक घाटनांदुर ते चोपनवाडी रोडने जात असताना रोडच्या पूर्व दिशेला सरकारी बाभळीच्या खाली पाच इसम संशयस्पद बसलेले दिसले त्यावरून त्याठिकाणी छापा टाकला आसता त्यांच्याकडे पिशव्यामध्ये गांजा सदृश माल मिळून आला. या सर्वांना पंचा समक्ष त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अनिल कांताराम जाधव उर्फ शेख सोहेल शेख खलील 2) प्रतीक भेटू मंडल 3) अजयमाल रमणमाल दोन्ही राहणार पश्चिम बंगाल असे सांगितले यावेळी दोन इसम पळून गेले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या सहा पिशव्यांमध्ये एकूण 121 किलो गांजा मिळून आला तसेच त्यांच्या कडे नगदी तीस हजार रुपये व तीन मोबाईल असे एकूण गांजासह 12,77,900-/ रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरच घटनास्थळ पंचनामा करून ताब्यात घेतला त्यानंतर पळून जाणारे इसमांची नावे विचारली असता त्यांनी ती 4) विक्रम मंडल 5) बिमान मंडल दोन्ही राहणार पश्चिम बंगाल असे सांगितले व सदर माल हा 6) शेख खलील शेख बशीरुद्दीन राहणार सातोना तालुका परतुर जिल्हा जालना याचा असल्याचे सांगितले म्हणून सदर सहा इसमाविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मानोव्यापारवर परिणामकारक करणारा पदार्थ अधिनियम 1985 नुसार कारवाई केली.सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पडवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर सपोनी घुगे सपोने कवडे तसेच पोलीस हवालदार अनिल दौंड, संजय राठोड, तानाजी तागड, सचिन सिद्धेश्वर, देशमाने, मुळे भागवत, मुंडे,धुमाळ, केकान, हरगावकर,अन्नमवार, वाले, बासर यांनी केली
