तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपा नंतर भक्तात खळबळ.
तपासणीत लाडूमध्ये जनावरांच्या चरबी आणि फिश ऑईल सापडल्याची पुष्टी
झुंजार न्यूज
तमाम भारत वासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपा ऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकताच केला होता. या आरोपानंतर लाडूचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीत लाडूमध्ये जनावरांच्या चरबी आणि फिश ऑईल सापडल्याची पुष्टी झाली आहे. या घटनेने अनेक भाविका मध्ये खळबळ उडाली आहे. तिरूपती बालाजी हे भारतातील जगप्रसिद्ध मंदिर असून देश विदेशातून येणारे लोक या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या मंदिराचं व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम द्वारे केलं जातं. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. याच लाडूच्या प्रसादाबाबत चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट दर्जाचे घटक वापरण्यात आले आहेत.जगनराजच्या काळात तिरुपती मंदिराच्या प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळली जात होती, असा आरोप नायडू यांनी केला होता. त्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. आता तपासानंतर अहवाल समोर आला असून त्यात जनावरांची चरबी आणि फिश ऑइल सापडल्याचे वृत्त आहे.
