अंबाजोगाई तालुक्यात रेल्वेने आलेला दिडशे कलो गांजा जप्त*
अंबाजोगाई – (प्रतिनिधी)
तालुक्यातील घाटनांदूर येथे रेल्वेने आलेला अंदाजे दिडशे किलो गांजा पोलिसांनी पकडल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण आणि परळी ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे.
सूत्रा कडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, परराज्यातून बीड जिल्ह्यात रेल्वेने गांजा आणला जात असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या विशेष पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथक तसेच अंबाजोगाई ग्रामीण व परळी ग्रामीण येथील पोलिसांनी संयुक्त टीम तयार करून रेल्वे स्थानकात रेल्वे आली असता छापा मारला. या कारवाईत अंदाजे १०० ते १५० किलो गांजा पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
