न्यू व्हिजन पब्लिक स्कुल, जोधाप्रसादजी मोदी विद्यालयात मराठवाड्याचा ७६ वा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- १७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत न्यू व्हिजन पब्लिक स्कूल अंबाजोगाई, जोधप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय येथील प्रांगणात ७६ वा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. न्यू व्हिजन पब्लिक स्कुल येथे संस्थेचे मार्गदर्शक डॉ. डी. एच. थोरात आणि संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या हस्ते तर जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे युवा उद्योजक रोहन कुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावर आपले मनोगत कु त्रिशा राजमाने व कु. प्रिया निकम यांनी केली . व्यासपीठावरून बोलतांना डॉ डी एच थोरात यांनी देखील मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामातील आठवणीना उजाळा दिला. मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे कार्य व त्यांचे बलिदान यावर देखील थोरात यांनी अधोरेखन केले .
यावेळी या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी , कार्यकारी संचालक संकेत मोदी, संचालक प्रा .वसंत चव्हाण , बी. आय.खडकभावी , ऍड विष्णुपंत सोळंके, प्रकाश सोलंकी, रिकबचंद सोळंकी, ॲड. संतोष पवार , माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक मनोज लखेरा ,कचरूलाल सारडा, पुरुषोत्तम चोकडा, धनराज सोळंकी , सुनील व्यवहारे, प्रा चंद्रकांत गायकवाड,सचिन जाधव, सुभाष पाणकोळी,किरण रूनवाल, बद्रीनाथ, गौरव कसबे प्राचार्य संतोष तर्के , प्राचार्या तपस्या गुप्ता , प्राचार्य नरेश जयस्वाल , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य , पालक , शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सर्वांना या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे बहारदार सूत्र संचलन शाळेचेच विद्यार्थी चि प्रणव फड व कु अनुष्का धपाटे यांनी केले.
