मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात; यो.शि.संस्थेच्या वतीने हुतात्मा स्मृती स्तंभास मानवंदना
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मराठवाड्यात मराठी शिक्षण रुजवणाऱ्या मोजक्या संस्थांपैकी योगेश्वरी शिक्षण संस्था ही एक अग्रेसर संस्था असून शिक्षणाचे पुरस्कर्ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी या संस्थेचे पुनर्जीवन केले या संस्थेचे विद्यार्थी देशात तसेच विदेशात विविध पातळीवर कार्यरत आहे हाच संस्थेचा मोठा नावलौकिक असल्याचे प्रतिपादन पुण्याच्या पशु संवर्धन विभागाचे आयुक्त कौशल कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले ते योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते
यावेळी जेष्ठ स्वातंत्रसेनानी लक्ष्मणराव बोंदर ,नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील प्रा डॉ महेश जोशी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ सुरेश खुरसाळे ,अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर , उपाध्यक्ष गणपत व्यास ,कार्यकारी उपाध्यक्ष एड जगदीश चौसाळकर ,सचिव कमलाकर चौसाळकर , सहसचिव प्रा भीमाशंकर शेटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने हुतात्मा स्मृती दालन,शोयब उल्लाखान स्मृती कक्ष, स्वामीजी निवास या दालनाचे उद्घाटन मान्यवर पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले
यावेळी पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने परिसरातील हुतात्मा स्मृतीस्तंभास मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.
प्रारंभीच्या प्रास्ताविकातून डॉ.सुरेश खुरसाळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम व हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृती कक्षाच्या उभारणीबाबत आणि संस्थेच्या इतर सामाजिक कार्याचा आढावा घेतला पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य आर व्ही कुलकर्णी यांनी करून दिला संचालन व उपस्थितांचे आभार प्रा. व्ही.जी.कळलावे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ. गणेश पिंगळे,प्राचार्य रमण देशपांडे,प्रा.एस.पी. कुलकर्णी,कलाशिक्षक गणेश कदम, किरण राऊतमारे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले
यावेळी संस्थेचे पदाधिकारी संचालक विविध विभागातील कर्मचारी शहरातील नागरिक उपस्थित होते .
