अंबाजोगाई न प तील पाणीपुरवठा विभागाच्या लाडक्या कंत्राटदाराने यश कन्स्ट्रक्शन कंपनी च्या वतीने अत्यंत दर्जेदार रित्या बनवलेला रस्ता 24 तासात जेसीबी लावून खोदला
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
यश कन्स्ट्रक्शन कंपनी च्या वतीने अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्याचे डांबरीकरण होऊन 24 तास ही लोटतात न लोटतात तोच अंबाजोगाई न प तील पाणीपुरवठा विभागाच्या लाडक्या कंत्राटदाराने अत्यंत दर्जेदार रित्या बनवल्या गेलेला हा रस्ता जेसीबी लावून खोदला असून भविष्यात हा कंत्राटदार या रस्त्याची वाट लावल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
मागील काही महिन्या पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंबाजोगाई शहरातील सर्वच रस्त्याची व बाजूच्या नाल्याची कामे प्रगती पथावर असून ही कामे मराठवाडयातील नामांकित आशा यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने अत्यंत दर्जेदार पद्धतीने बनवली जात आहेत. मात्र काही रस्त्याला शहरातील काही विघ्न संतोषी लोका कडुन व्यत्यय येताना दिसत आहे.
यातच शहरातील संत भगवान बाबा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे अशा कोट्यवधी रुपये खर्च करून बनवल्या जात असलेल्या या रस्त्याचे काम मागील काही महिन्या पासून प्रगतीपथावर असुन रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग खोदकाम करून त्यान नवीन खडी भरण्यात आली आहे. या दरम्यान अंबाजोगाई नगर परिषदेने आपल्या लाडक्या कंत्राटदारा कडुन रस्त्याच्या खालून गेलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे लिकेजेस काढून घ्यायला हवे होते, या लाईन वर वॉल कुठे आहेत त्या जागी तशा निशाण्या करून ठेवायला हव्या होत्या. मात्र नगर परिषद व कंत्राटदार यांनी ते काहीच केले नाही.
बुधवारी यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने संत भगवान बाबा चौक ते डॉ बाबा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्याचे अत्यंत दर्जेदार पणे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले. हे डांबरीकरण करून 24 तास ही लोटत नाहीत तोच गुरुवारी सकाळी न प च्या पाणी पुरवठा विभागातील लाडका कंत्राटदार जेसीबी घेऊन नव्याने बनवलेला रस्ता पाणी पुरवठा लाईन वरील वॉल कुठे गेला म्हणून रस्ता खोदत निघाला.
पाणी पुरवठा विभागाच्या कंत्राटदाराने वॉल शोधण्यासाठी नव्या रस्त्याला सुरुंग लावला असून भविष्यात पाईपलाईन लिकेजेसच्या नावा खाली नगर परिषद व लाडका कंत्राटदार संपूर्ण रस्त्याची वाट लावल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
