प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंबाजोगाई केंद्रात २० सप्टेंबर रोजी प्रकृति, पर्यावरण एवं आपदा प्रबंधन जनजागृती अभियानाच्या स्वागत समारोहाचे आयोजन
अंबाजोगाई केंद्र संचालिका ब्रम्हाकुमारी सुनीता बहेनजी यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आनंद सरोवर, वाघाळा रोड, योगेश्वरी नगरी जवळ, अंबाजोगाई केंद्रात शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी प्रकृति, पर्यावरण एवं आपदा प्रबंधन जनजागृती अभियानाच्या स्वागत समारोहाचे आयोजन ब्रम्हाकुमारीज, आनंद सरोवर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंबाजोगाई (जि. बीड) येथे करण्यात आले आहे अशी माहिती अंबाजोगाई केंद्र संचालिका ब्रम्हाकुमारी सुनीता बहेनजी यांनी दिली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंबाजोगाई केंद्र संचालिका ब्रम्हाकुमारी सुनीता बहेनजी यांनी सांगितले की, राज्यातील सोलापूर, उमरगा, उदगीर, लातूर, बीड, धाराशिव, बार्शी, अकलूज, पंढरपूर आणि अंबाजोगाई शहरात १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रकृति, पर्यावरण एवं आपदा प्रबंधन जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अंबाजोगाई केंद्रांतर्गत एकूण १४ ठिकाणी हे अभियान प्रवचन, प्रदर्शनी, दृकश्राव्य माध्यम शो, स्लाईड शो, गीत-संगीत, स्लोगन्स आर्दीचा आधार घेऊन व्यापकपणे राबविण्यात येत आहे. समाजात जनजागृती करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचे आपल्या अंबाजोगाई शहरातील ब्रम्हाकुमारीज, आनंद सरोवर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या ठिकाणी २० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगी ब्रह्माकुमार मोहन सिंघल (अध्यक्ष, वैज्ञानिक व अभियंता प्रभाग माऊंट आबू.), तर मुख्य वक्ता म्हणून राजयोगी ब्रह्माकुमार भारत भूषण भाई पानिपत (नॅशनल कोऑर्डिनेटर एसईए प्रभाग) हे आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भ्राता डॉ.बी.वाय. खडकभावी (प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाई.), भ्राता ऍड. श्रीकृष्ण तोष्णीवाल (अध्यक्ष, बीड जिल्हा माहेश्वरी सभा, अंबाजोगाई.), भ्राता कल्याण काळे (अध्यक्ष, रोटरी क्लब, अंबाजोगाई सिटी.) तसेच यावेळी राजयोगी ब्रह्माकुमार भरत भाई (मुख्यालय कोऑर्डिनेटर, एसईए प्रभाग, मुख्य अभियंता, शांतिवन.), राजयोगी ब्रह्माकुमार पियुष भाई दिल्ली (झोनल कोऑर्डिनेटर एसईए प्रभाग), राजयोगिनी ब्रह्माकुमारी अस्मिता (कार्यकारी सदस्या एसईए प्रभाग.), बी. के. नरेंद्र पटेल बडोदा (कार्यकारी सदस्य एसईए प्रभाग), राजयोगिनी ब्रह्माकुमारी संगीता (संचालिका, बार्शी सेवाकेंद्र), बी. के. महेश भाई इंदौर (सदस्य, एसईए प्रभाग), ब्र.कु. प्रताप भाई (नि. सहा. मुख्य अभियंता, जल संधारण विभाग), बी. के. सुप्रिया बहन (माऊंट आबू-राज), बी. के. दिनेश भाई (माऊंट आबू-राज), बी. के. धनंजय भाई (माऊंट आबू-राज), बी. के. विष्णू भाई (माऊंट आबू-राज), बी. के. श्रीनिवास भाई (माऊंट आबू-राज) आणि स्वागतोत्सुक म्हणून राजयोगिनी ब्रह्माकुमारी महानंदा (संचालिका, उदगीर सेवाकेंद्र) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी आपदा प्रबंधन में सकारात्मक चिंतन का महत्व या विषयावर मौलिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर, तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंबाजोगाई केंद्र संचालिका ब्रम्हाकुमारी सुनीता बहेनजी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आनंदसरोवर, अंबाजोगाई व वैज्ञानिक व अभियंता प्रभाग, राजयोग शिक्षा र शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू राजस्थान यांच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे.
