गणेशोत्सव सोहळा शांतते मध्ये पार पाडल्या मुळे येथील सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घोळवे सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न
आंबाजोगाई (प्रतिनिधी) : कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ न देता गणेशोत्सव व श्री गणेश विसर्जन सोहळा शांतते मध्ये पार पाडल्या मुळे येथील सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घोळवे सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई शहरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. 10 दिवस संपन्न झालेल्या या उत्सवात 86 सार्वजनिक गणेश मंडळाने रीतसर परवाना काढून श्री गणेशाची स्थापना केली. मंगळवारी या सर्व गणेश मंडळाचे विसर्जन करण्यात आले. अंबाजोगाई शहराच्या मुख्य रस्त्याहून निघालेल्या 40 मिरवणुका सह परिसरातील जवळपास 61 सार्वजनिक गणेश मंडळाने मिरवणुका काढून श्री गणेशाला अखेरचा निरोप दिला. अंबाजोगाई शहरात 10 दिवस शांततेत पार पडलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने झाली. या विसर्जनाच्या वेंळी बोटावर मोजण्या एवढ्या गणेश मंडळा समोर देखाव्याचे उत्कृष्ट व पारंपारिक पद्धतीने सादरीकरण सुरू होते. बोटावर मोजण्या एवढी गणेश मंडळे वगळता अनेक गणेश मंडळातील तरुणाईची हुल्लड बाजीच दिसून येत होती. अनेक गणेश मंडळा कडुन कर्कश्य आवाजातील डिजे व डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई दिसुन आली. श्री गणेश विसर्जन मिरवणूका पाहण्या साठी सह कुटुंब आलेल्या गणेश भक्तांना गर्दीत घुसून धावणाऱ्या दुचाकी स्वारांचा कमालीचा त्रास सहन करावा लागला. आज पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेश भक्तांसाठी प्रशासना कडुन लाकडी बांबू किंवा अन्य पद्धतीने बेरिगेटिंग केल्या जात असे मात्र यावेळी ती न केल्याने गणेश भक्ता कडुन बेशिस्तीचे दर्शन पहावयास मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेश मंडळा कडुन स्वतःच्या मर्जीने घेतल्या जात असलेल्या वेळे मुळे व स्वतःच्याच सादरीकरणा मुळे पाठीमागून येणाऱ्या गणेश मंडळा ची भ्रम निराशा झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यान दोन गणेश मंडळाच्या मिरवणुकीत 100 मीटर पर्यंत गॅप पडू लागल्याने मागील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका पर्यंतच्या दोन गणेश मंडळात कमालीची गर्दी झाली होती. रात्री 12 पर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोचणार नाहीत याची खात्री असणारे काही गणेश मंडळे परत फीरून अन्य मार्गाने श्रीगणेश विसर्जन स्थळी पोचू लागली. या बेशिस्ती मुळे अनेक बाल कलाकारांचा आपल्या कलेचे सादरीकरण करता न आल्याने हिरमोड झाला व त्यांना आल्या पावली परतण्याची वेळ आली. पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्री 12 वाजेपर्यंत गणेश मंडळाला वाद्य वाजवण्यास परवाना देण्यात आला होता त्यामुळे 12 नंतर सर्वच गणेश मंडळाचे वाद्य बंद करण्यात आले. मात्र शांततेत मिरवणुका विसर्जन स्थळी म्हणजे बोरूळ तलावावर पोचल्या आणि दुसरे दिवशी सकाळी 9 वाजता अखेरच्या श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले. एकूणच अंबाजोगाई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीसअधीक्षक चेतना तिडके मॅडम, डी वाय एस पी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक विनोद घोळवे यांनी केलेल्या नियोजन बद्ध पोलीस बंदोबस्तामुळे संपूर्ण गणेशोत्सव व श्री गणेशाच्या मिरवणुका कुठलाही अनुचित प्रकार गडबड गोंधळ न होता शांतते मध्ये पार पडला. महसूल प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, वीज वितरणचे सर्व अधिकारी-कर्मचारी, मेडिकल टीम, नगरपरिषद प्रशासन अग्निशमन दल, स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे, तसेच सामाजिक व राजकीय या सर्वांचे गणेशोउत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ न देता गणेशोत्सव व श्री गणेश विसर्जन सोहळा शांतते मध्ये पार पाडल्या मुळे येथील सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घोळवे सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुलदीप परदेशी, उपाध्यक्ष श्याम अपूर्वा, सचिव निलेश मुथा, योगेश परदेशी यांच्या सह रोहित मोदी, निहाल परदेशी, सुरेश राठोड, अश्विन परदेशी, आशिष परदेशी, शुभम टाक, हर्ष मुथा, लखन शर्मा, संतोष परदेशी, विक्रम परदेशी, गोविंद परदेशी यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
