मा खा राहुल गांधी यांची जीभ कापण्याची भाषा होत असताना बीड जिल्ह्यातील काँग्रेस मात्र मुग गिळून गप्प
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे केंद्र सरकार मधील विरोधी पक्ष नेते मा खा राहुल गांधी यांची जीभ कापण्याची भाषा करत असताना बीड जिल्ह्यातील काँग्रेस मात्र मुग गिळून गप्प बसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
दोन दिवसा पूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी केंद्र सरकार मधील विरोधी पक्ष नेते मा खा राहुलजी गांधी यांची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करणारे बेताल वक्तव्य केले. आ संजय गायकवाड यांच्या या वक्तव्या मुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला. सामान्य माणसातही चीड निर्माण झाली. विरोधी पक्षा कडुन या वक्तव्याचा समाचार घेत आ संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली.
एवढेच नव्हे तर बुलढाणा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तक्रारी वरून बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये भादवी 351(2), 351 (4), 192, 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र असे असताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तक्रार देणे सोडा साधा निषेधही आज तागायत नोंदवण्यात आलेला नाही, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे भाषण ठोकण्यात माहीर असताना व आपल्या नेत्याची जीभ कापण्याची भाषा एखादा व्यक्ती करत असताना राजेसाहेब देशमुखा सह बीड जिल्हा काँग्रेस मात्र मुग गिळून गप्प बसल्या मुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
