माकपचे नेते कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अंबाजोगाई येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली
अंबाजोगाई (प्रतिनिधी): मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे देशाचे नेते कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अंबाजोगाई येथे दिनांक १४ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नैतिकतेची चौकट आखून घेतलेल्या केडर बेस्ड पक्षाला आजच्या उथळ आणि बाजारू व्यवस्थेत निसर्गत: अनेक मर्यादा पडतात. तशाही परिस्थितीत डाव्या राजकारणाला सतत राजकीय परिघाच्या चर्चेत ठेवन्यात कॉम्रेड येचुरी यांचे मोठे योगदान होते.त्यांचं जाणं अकाली असल्याने ते नुकसान मोठे आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे देशाचे महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांना अंबाजोगाई येथील विलासराव देशमुख सभागृहामध्ये दिनांक १४ सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय शोकसभेच्या वेळी कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या प्रतिमेला पुष्प,हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉ. बब्रुवान पोटभरे, राजेसाहेब देशमुख, राजकिशोर मोदी, डॉ. नरेंद्र काळे, मदन परदेशी, ऍड शिवाजी कांबळे, दगडू दादा लोमटे, नानासाहेब गाटाळ, कालिदास आपेट, ऍड अजय बुरांडे,ऍड डिगोळे, ऍड तिडके,विनोद शिंदे, आदित्य कासारे आदींनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.या शोकसभेला सुहास चंदनशिव, देविदास जाधव, अनिकेत लोहिया,प्रशांत मस्के,सिद्राम सोळंके सह शहरातील डॉक्टर, वकील,प्राध्यापक,विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आधी उपस्थित होते .
