अंबाजोगाई

अंबाजोगाई व परिसरात मोकाट पणे फिरणाऱ्या गोमाता व गोवंशाचे अपघात टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचा सरस्वती गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई व परिसरातील रानावनात, रस्त्यावर मोकाट पणे फिरणाऱ्या गोमाता व गोवंशाचा अपघात टाळण्यासाठी येथील सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने येथील स्व गोपीनाथराव मुंडे गोशाळेतील सर्व गोवंशाच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बसवण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.

मागील अनेक वर्षा पासून येथील गुरुवार पेठ भागात असणाऱ्या सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन या वर्षी मंडळाच्या वतीने एक अगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तो म्हणजे अंबाजोगाई व परिसरातील रानावनात, रस्त्यावर मोकाट पणे फिरणाऱ्या गोमाता व गोवंशाचा अपघात टाळण्यासाठी येथील त्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बांधणे. या साठी मंडळाच्या वतीने अंबाजोगाई- परळी रोडवर वरवटी येथे मागील 8 वर्षा पासून ऍड. अशोक मुंडे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे गोशाळेत जाऊन जवळपास 125 गोमाता व गोवंशा च्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बांधण्यात आले.

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर, रोहिदास हतागळे, ऍड अशोक मुंडे यांची उपस्थिती होती. या वेळी

तर या वेळी मंडळाचे अध्यक्ष कुलदीप परदेशी, उपाध्यक्ष श्याम अपूर्वा, सचिव निलेश मुथा, योगेश परदेशी यांच्या सह रोहित मोदी, निहाल परदेशी, सुरेश राठोड, अश्विन परदेशी, आशिष परदेशी, शुभम टाक, हर्ष मुथा, लखन शर्मा, संतोष परदेशी, विक्रम परदेशी, गोविंद परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मंडळाच्या वतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आल्या नंतर माणुसकीची भिंत या उपक्रमा अंतर्गत वापरलेल्या कपड्याना एकत्रित करून ती गरजु व्यक्तीना वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला. मोफत रक्त तपासणी व आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले.

पिंपळा धायगुडा येथील वृद्धाश्रमातील वयोवृद्ध माता पुरुषांना अन्नदान करण्यात आले. गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.

मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात बांधकाम कामगारांसाठी टोपी व रिफ्लेक्टर जॅकेट वाटप करण्यात येणार असून गरीब वस्त्या मध्ये मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यास ग्लोज, हेअर कवच वाटप व स्वच्छते करिता मार्गदर्शक पोस्टर करण्यात येणार असून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, योग प्राणायाम शिबीर, गरजू वृद्धांसाठी काठी व चष्मे वाटप, कामगारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवशी आकर्षक देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार असून

महिलासाठी खास आकर्षण म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या वर्षीच्या गणेश विसर्जनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मिरवणुकीत संपूर्ण महिलाचे ढोल पथक असणार असून याचे नेतृत्व रचना परदेशी या करणार आहेत या पथकात साक्षी परदेशी, पूनम परदेशी, आकांक्षा परदेशी, राजश्री अपूर्वा, जयश्री अपूर्वा, मनीषा माने, रेणुका माने यांच्या सह अन्य महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अंबाजोगाई व पंचक्रोशी मध्ये सरस्वती गणेश मंडळा सारखे सामाजिक उपक्रम एकही गणेश मंडळ राबवत नसल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!