अंबाजोगाई

गुंगीचे औषध पाजवून 3 लाख 60 हजार रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीस परळी पोलिसांनी छ. संभाजी नगर मधून केले जेरबंद

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

 

परळी नांदेड बस मध्ये एका महिला प्रवाशास गुंगीचे औषध पाजवून तिच्या जवळील 3 लाख 60 हजार किंमतीचे दागिने लंपास करणाऱ्या इसमास परळी पोलिसांनी छ. संभाजीनगर जिल्ह्यातून ताब्यात घेत त्याच्या कडुन सर्व माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

अतिशय गुंतागुंतीच्या या तपासा विषयी प्राप्त माहिती अशी की, कमल ज्ञानोबा सुरवसे वय 50 वर्ष रा. बसवेश्वर कॉलनी परळी ही महिला

दिनांक 08/08/2024 रोजी सकाळी 70.30 वाजण्याच्या सुमारास परळी बसस्थानक येथून नांदेड येथे परळी ते नांदेड बसने जात असताना बसमध्ये एक अनोळखी इसमाने तिला बिस्कीट आणि पाणी दिले. पाणी दिल्यानंतर तिला चक्कर आली व ती बेहोष झाली. या वेळी त्या इसमाने तिच्या हातातील सोन्याच्या दागिन्यासह 3,60,000/-तीन लाख 60 हजार किमतीचा मुददेमाल कडून घेवून फसवणूक केली. या प्रकरणी कमल सुरवसे हिच्या फिर्यादी वरून पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी जि.बीड येथे सदर इसमा विरुद्ध गुरनं 124/2024 कलम 31864), 319 (2) बीएनएस 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा.पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व मा.अपर पोलीस अधिश्यक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले साहेब यांचे सुचने प्रमाणे परळी शहरात नवीन अद्यावत बसविलेल्या सी सी टी व्ही कॅमेरेचे फुटेजच्या आधारे, तसेच सायबर सेल बीड यांची तांत्रिक मदत घेवून सदर गुन्हयातील अनोळखी आरोपी अमोल धोंडीबा मस्के वय 50 वर्ष रा. बोधेगाव ता. फुलंब्री जि छत्रपती संभाजीनगर यास निष्पन्न करून नमुद आरोपीकडे सखोल तपास केला व त्याच्याकडून 3,50,000/- रुपये किंमतीचा सोन्याचा मुदद्देमाल हस्तगत केला आहे. मा. पोलीस निरीक्षक श्री. धनजंय ढोणे साहेव, सहायक पोलीस निरीक्षक श्री.प्रविण जाधव साहेब, पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल शिंदे साहेब, पोहे 1253 नरहरी नागरगोजे, पोको 2098 व्यंकट डोरनाळे, पोकों/710 भगवान चव्हाण, पोकॉ 221 शंकर डोगळे पोलीस ठाणे संभाजीनगर यांनी केली.

 

*नरहरी नागरगोजे यांची विषेश कामगिरी*

 

एकेकाळी अंबाजोगाई शहरातील अनेक चोऱ्या, दरोड्याचा तपास लावणारे पोहेकॉ नरहरी नागरगोजे यांनी परळी शहरात घडलेल्या या गुन्ह्याच्या तपासात स्वतः झोकून देऊन आपल्या सोर्सेस ने आरोपीची माहिती काढली व स्वतः काही सहकार्यांना संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथे आरोपीस नाट्यमय रित्या अटक केली, त्याच्या कडुन गुन्ह्याची कबुली घेऊन त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करण्याची महत्व पूर्ण कामगिरी बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!