अंबाजोगाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जाहीर केलेल्या योजना मुळे अंबाजोगाई शहर मध्यवर्ती कार्यालय एकनाथ आश्रम व्हावे -ज्योतीताई वाघमारे

अंबाजोगाईत शिवसेनेचे भगवे वादळ

अंबाजोगाई (प्रतिनिधी) महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रयत्न करून पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले. शिवसेनेच्या वतीने आयोजित कामगार व शिवसैनिकांच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना प्रवक्त्या ज्योती ताई वाघमारे, संपर्क प्रमुख विजय पाटील, युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण,जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,युवा व्याख्याते किरण कोरे, प्रदेश समन्वयक वैजनाथ वाघमारे, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे यांच्या शहर कार्यालय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,प्रस्ताविक करताना उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी कामगारांच्या समोरच्या समस्या मांडुन त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले तर ऋषिकेश लोमटे यांनी हे कार्यालय जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर राहिन असे आश्वासन दिले. मंगेश चिवटे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील असुन लाडकी बहिण योजना देऊन महिलांना मोठा आधार दिला आहे यापुढे कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ज्योती ताई वाघमारे म्हणाल्या जसे बाळासाहेब भवन,आनंद आश्रम मधुन जनतेचे प्रश्न सोडवले जातात तसे शहर मध्यवर्ती कार्यालय एकनाथ आश्रम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे,किरण कोरे , संपर्क प्रमुख विजय पाटील, जिल्हा प्रमुख सचीन मुळुक यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याच्या निमित्ताने चौका चौकात लावलेले भगवे झेंडे व फलक यामुळे अंबाजोगाईत भगवेमय वातावरण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसांपासून घेतलेले माझी बहिण लाडकी बहिण योजने सारखे निर्णय या मुळे शहरात शिवसेने कडे नविन तरुणांचा ओढा वाढला आहे आगामी काळातील निवडणुकीत नक्कीच याचा फायदा होईल अशी चर्चा शहरात होताना दिसत आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी दादासाहेब देशमुख, दत्ता आबा बोडके,रमेश टेकाळे,दत्ता नाना देवकर,खंडु पालकर,दशरथ चाटे,विजय जाधव, समाधान पिसाळ, धर्मराज मोरे, अवधूत कदम, उषाताई यादव,अॅड.सुनीता जोशी,सौरभ आडे,कामगार सेनेचे व कामगार संघटना,अॅटोयुनियनचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याला कामगारांची प्रचंड मोठी उपस्थिती होती,शिवसेनेचा एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदा झाला अशी चर्चा शहरात होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!