निष्ठावंत म्हणून मिरवणारे अंबाजोगाई तालुक्यातील कार्यकर्ते विरोधी नेत्यांच्या तंबूत दाखल होत “निष्ठावंताच्या आयचा घो” म्हणू लागली
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : सर्वच राजकीय पक्षातील नेते ज्या प्रमाणे स्वतःचा स्वार्थ साधण्या साठी या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आहेत त्यांचाच आदर्श घेऊन अंबाजोगाई तालुक्यातील असंख्य कार्यकर्तेही आता कोण चालू लाभा साठी तर कोण भविष्यातील लाभाची स्वप्ने घेऊन आपले नेते बदलून दुसऱ्या नेत्यांच्या तंबूत दाखल होत “निष्ठावंताच्या आयचा घो” म्हणताना दिसत आहेत. एक काळ होता राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना आपल्या पक्षा विषयी आत्मीयता होती, निष्ठा होती. नेते आपला पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस प्रयत्नशील असायचे, आपल्या नेत्या प्रति खालचे कार्यकर्ते प्रामाणिक एकनिष्ठ असायचे, नेत्यांच्या निवडनूका आल्या की कार्यकर्ते जीवाचे रान करायचे, स्वतःच्या घरची बांधून आणलेली चटणी भाकरी खाऊन गावोगावी प्रचार करायचे. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. नेत्यांची आपल्या पक्षावरील निष्ठाही पक्षा प्रमाणेच उडत गेली आहे व त्यामुळेच मागील पाच-दहा वर्षात राज्य व देश पातळीवर घसरलेली राजकारणाची पातळी हा एक चर्चेचा विषय ठरल्या गेली आहे. ईडी, सीबीआय या सारख्या यंत्रणे मुळे राजकीय पक्षातील नेत्यांची विश्वास अहर्ता संपुष्टात आली आहे. कोण कोणत्या पक्षात केव्हा उडी मारेल? कोण कोणाला घेऊन सरकार मध्ये सत्तेचा वाटेकरी होईल हे सांगणे भविष्यवेत्त्याला ही सांगणे कंठींन झाले आहे. ज्या प्रमाणे देश व राज्य पातळीवरील नेत्यांनी मतदारांचा विश्वास गमावला आहे त्याच प्रमाणे नेत्यांचाच आदर्श घेऊन आपल्या नेत्यांचा व मतदारांचा विश्वास गमावताना दिसत आहेत. अगदी सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे ही कोणत्या वेळी कोणत्या नेत्यांच्या बगले मध्ये जाऊन बसतील हे सांगणे कंठींन झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यासह केज मतदार संघात नंदकिशोर मुंदडा व राजकिशोर मोदी या दोघांचे प्राबल्य आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मागील काही महिन्यातील अंबाजोगाई तालुक्याची राजकीय वाटचाल पाहिली तर या दोन्ही नेत्या कडे या पक्षातून त्या पक्षात उडी घेतलेले काही कार्यकर्ते आले आणि या कार्यकर्त्यानी नेत्यांच्या कानात छु मंतर करून त्यांच्या ह्रदयात आता तरी पक्के स्थान निर्माण केले. त्या मुळे या नेत्याकडे असलेल्या जुन्या कार्यकर्त्याच्या मनात नवीन आलेल्या येऊन कारभारी बनलेल्या कार्यकर्त्या विषयी “मागून आली आणि गरवार झाली” ही धारणा होऊन नेत्या विषयीच असंतोष निर्माण झाला व दोन्ही कडील कार्यकर्ते परस्पर विरोधी नेत्यांच्या कळपात उड्या घेऊ लागले. मोदी कडुन मुंदडा यांच्या कळपात उड्या मारणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची लागलीच कंत्राटी कामे देऊन बोळवण होऊ लागली त्या मुळे यांच्या कडे उड्या मारणारांची संख्या अधिक दिसू लागली असून यात ज्यांच्या मागे काडीचाही जनाधार नाही अशाही कार्यकर्त्यांच चांगभलं होताना दिसत आहे. तर मुंदडा यांच्या कळपातील काही कार्यकर्ते भविष्यात आपला फायदा होईल ही लाभाची स्वप्ने घेऊन व मोदी यांच्या कडुन आश्वस्त होऊन त्यांच्या कळपात दाखल होताना दिसत आसून आज पर्यंत निष्ठावंत म्हणून मिरवणारे कार्यकर्ते दुसऱ्या नेत्यांच्या तंबूत दाखल होताना “निष्ठावंताच्या आयचा घो” म्हणताना दिसत आहेत.
