अंबाजोगाईच्या स्थानिक एकाधिकार शाहीला झुगारून कुलस्वामिनी मित्र मंडळाच्या अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुका व शहरातील एकाधिकार शाहीला झुगारत प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ९ येथील भाजपच्या अनेक आजी माजी पदाधिकारी, तरुण युवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे हात बळकट करून पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नव्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, खालेद चाऊस,महादेव आदमाणे,दिनेश भराडीया ,संकेत मोदी, माणिकभाऊ कदम, जनार्धन राऊत, गणपतराव वाघमारे, किसनराव जाधव, अमृत काळे यांची उपस्थिती होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या मध्ये कुलस्वामिनी मित्र मंडळाचे सुशिलकुमार वाघमारे, हुसेन चौधरी , सुनिल साठे, संजय शिंदे, किशोर गोरे, हरिराम जगताप , राहुल कदम , प्रशांत वाध, सुरेश टेकाळे, अंबादास गाढवे, विवेक केंद्रे, सुधीर सुरवसे, नवनाथ काळे, गोरख काळे, उमेश सुरवसे, दिनेश सुरवसे, मुकेश सुरवसे, परमेश्वर माने,योगीराज सुरवसे, शेख इम्रान, शेख करीम शेख मुन्ना,गोटू उपाध्याय, आदित्य लोढा, राघव उपाध्याय, ऋषिकेश गवळी, अभिनव उपाध्याय, विशाल फुलारी, आकाश फुलारी,शिवसंदेश राऊत, नामदेव माने, श्रीकांत काळे यांचा समावेश आहे. यावेळी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे श्रीमती कावेरी मारोतीराव राऊत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकारी माणिक भाऊ कदम हे होते. नव्यानेच पक्षप्रवेश केलेले हुसेन गवळी यांनी राजकिशोर मोदी हे गेली कित्येक वर्ष अंबाजोगाई शहरात अतिशय चांगले काम करत आहेत आणि त्यामुळे चांगले काम करणाऱ्या सोबत आपण रहावे व त्यांना साथ द्यावी या उद्देशाने आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे हुसेन गवळी यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक महादेव आदमाने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की मागील काही दिवसपासून अंबाजोगाई शहरात युवकांना व इतर पक्षातील कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे आमिष तथा प्रलोभने देऊन फोडाफोडीचे राजकारण जोमात चालू आहे.याचा प्रत्यय वैयक्तिक मला स्वतःला देखील आला असून मलाही बाजूला घेण्याचा प्रयत्न केला गेला पण ते त्यात असफल राहिल्याचे आदमाणे यांनी याप्रसंगी नमूद केले. अंबाजोगाई शहर व परिसराचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास राजकिशोर मोदी यांनीच केला. पक्षात नवीन प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे महादेव आदमाने यांनी अभिनंदन करत त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात राजकिशोर मोदी यांनी मार्गदर्शन करतांना कुलस्वामिनी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश दिल्याचे सांगताना माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ज्या ठिकाणाहून झाली त्याच ठिकानी व त्याच जेष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थिती मध्ये या युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा होत असल्याने अतिशय अभिमानाने सांगितले. ज्या लोकांनी मला माझ्या राजकिय जीवनापासून साथ दिली तेच सहकारी आजही माझ्या सोबत राहून माझ्यावर तेवढेच प्रेम करतात हे सांगताना राजकिशोर मोदी यांचा कंठ दाटून आला होता. आपण आजपर्यंत कुठलीही जात धर्म न पाहता सर्वांना सोबत घेऊन काम केल्याची कबुली यावेळी मोदी यांनी दिली. या कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर, स्व.विजयकुमारजी जाजू तसेच स्व. भगवानराव लोमटे यांची आठवण काढत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. आपल्या राजकीय जीवनात नेहमीच गुरुवार पेठ परिसराला झुकते माप देऊन तेथील विकास साधला आहे. येथील नागरिकांनी केलेल्या सहकार्यातून थोड्याफार प्रमाणात उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगत यापुढे येथील नागरिक व युवकांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नसल्याचे अभिवचन याप्रसंगी मोदी यांनी दिले. तरुणांनी निर्व्यसनी राहून आपल्या कुटुंबासोबतच आपल्या समाजाचा विकास करण्याचे आवाहन यावेळी राजकिशोर मोदी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कुलस्वामिनी मित्र मंडळ गुरुवार पेठ येथील सर्व पदाधिकारी व युवकांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे युवकांना सांगितले. या पक्ष प्रवेश सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप गुरुवार पेठ परिसरातील प्रतिष्ठित जेष्ठ सहकारी माणिकराव कदम यांनी केला. यावेळी तरुणांनी समाजसेवा तसेच देशसेवा करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. राजकिशोर मोदी हे गेली चाळीस वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले असून त्यांच्यामध्ये विकासाची दूरदृष्टी असल्यामुळेच हे सर्व होऊ शकल्याचे कदम यांनी सांगितले. अशाच दुरदृष्ट्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आज गुरुवार पेठ परिसरातील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याचे उल्लेखित केले. या सर्व युवकांचे अभिनंदन करून त्यांना पक्षातील पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी चंद्रकांत महामुनी, बबन पाणकोळी, सुधाकर टेकाळे, शाकेर काझी, आश्विन सावंत, सय्यद ताहेर, अंकुश हेडे,सय्यद रशीद, दत्ता सरवदे, खलील जाफरी, सचिन जाधव, मतीन जरगर, शुभम लखेरा, अकबर पठाण, अस्लम शेख,शरद काळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. हा पक्ष प्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी सय्यद ताहेर, विजय कोंबडे, सुनील व्यवहारे, आदींनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार आनंद टाकळकर यांनी केले.
