सीबीएसई बीड सहोदया स्कूल्स आदर्श शिक्षक पुरस्कार श्री सरस्वती पब्लिक स्कूलच्या श्री.युवराज पाटील यांना जाहीर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी सीबीएसई बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सने यंदापासून आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.शै.व.२०२४-२५ साठी एकूण २२ सीबीएसई शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.ज्यामध्ये एम आय टी पुणे संचलीत श्री सरस्वती पब्लिक स्कुल अंबाजोगाईच्या श्री.युवराज हणमंत पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी गेवराई येथील आर के पब्लिक स्कूलमध्ये होणार असून त्यास दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तर आर के पब्लिक स्कूलचे संचालक आर.के.चाळक हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच या सोहळ्यासाठी सीबीएसई बीड सहोदया स्कूल्सच्या विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
पुरस्कारपात्र श्री.युवराज पाटील यांचे एम.आय.टी पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.वि.दा.कराड,अंबाजोगाई स्कूल डिव्हीजन चे कार्यकारी संचालक श्री राजेशजी कराड, सौ.शुभांगी ताई कराड, संचालक संगप्पा तलेवाड, प्राचार्य सागर राऊत ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
