राज्यातील एकही रुग्ण आरोग्य सुविधे विना दगावनार नाही या साठी मुखुमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न मंगेशजी चिवटे यांचे उदगार
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मागील सव्वादोन वर्षात 321 कोटीची मदत
अंबाजोगाई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे यांच्या मुळे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मागील सव्वादोन वर्षात 321 कोटी रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णाना झाली असून राज्यातील एक रुग्ण आरोग्य सुविधे विना दगावनार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत असे उदगार मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख तथा विषेश कार्यकारी अधिकारी मंगेशजी चिवटे यांनी काढले. शिवसेना वैद्यकीय कक्ष व रामहारी राऊत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई शिवसेनेच्या पुढाकारातुन आयोजित करण्यात आलेल्या जयपूर फूट वाटप कार्यक्रम प्रसंगी मंगेशजी चिवटे हे बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहारी राऊत, व्याख्याते किरण कोरे, सौ.रत्नमाला मुंडे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे, डॉ सिद्धेश्वर बिराजदार, डॉ घुगे, डॉ राजेश इंगोले, डॉ अतुल शिंदे, डॉ दीपक लामतुरे, डॉ संदीप मोरे, ऍड जयंत भारजकर, नगरसेवक बबन लोमटे, अनंत वेडे, अनंत लोमटे, सामाजिक कार्यकर्ते दाजीसाहेब लोमटे, संजय साळवे, शेख मुक्तारभाई यांच्या सह असंख्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना मंगेशजी चिवटे म्हणाले की, माझं काम हे टीम वर्क आहे, खांद्याला खांदा लावून सर्वजण काम करत आहेत. आज पर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीततून 5 हजार मोफत सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या आहेत. सव्वा दोन वर्षात 321 कोटींची मदत वाटप केली गेली, आम्ही मदत करताना कुठलीही जात पात धर्म पक्ष पाहात नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांनी हिंदू मुस्लिम यांचं धृवीकरणं कधी होऊ दिल नाही, महिला साठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3 हजार पर्यंत केला जाणार आहे. 10 हजार कृत्रिम हात पाय शिल्लक आहे, अंबाजोगाई केज व पंचक्रोशितील कोणीही दिव्यांग राहणार नाही याची काळजी ऋषिकेश लोमटे यांनी घ्यावी. या वेळी बोलताना किरण कोरे म्हणाले की प्रत्येक माणूस दुःख घेऊन वावरत आहे, आपल्या सर्वां पेक्षा दिव्यांगाच दुःख वेगळं आहे. या वेळी डॉ शंकर धपाटे, डॉ राजेश इंगोले, बबन भेय्या लोमटे, दत्तात्रय अंबेकर आदींनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप दाजीसाहेब लोमटे यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश लोमटे यांनी तर आभार गजानन मुडेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मामा काळे यांनी केले,
