बाल वयात आई वडीला नंतर शिक्षकांनी केलेले संस्कार मोलाचे असतात- डॉ . सुनिता बिराजदार यांचे उदगार
बाल वयात आई वडीला नंतर शिक्षकांनी केलेले संस्कार मोलाचे असतात- डॉ . सुनिता बिराजदार यांचे उदगार
अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) बालपणी आई – वडिलांच्या नंतर शिक्षकांचे संस्कार मोलाचे असतात असे उदगार डॉ . सुनिता सिध्देश्वर बिराजदार यांनी काढले .येथील रोटरी सभागृहात गुरुवारी इनरव्हील क्लब च्यावतीने निवडक शिक्षकांना . राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ . सुनिता बिराजदार बोलत होत्या . या प्रसंगी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुरेखा सिरसाट , सचिव संगीता नावंदर यांची उपस्थिती होती . डॉ. बिराजदार म्हणाल्या, बदलत्या सामाजिक वातावरणात शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे . आपले अध्यापनाचे काम करताना काही जण विविध उपक्रम राबऊन विद्यार्थी घडविण्याचे काम करतात . विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडविण्याचे ते काम करतात . या वेळी निवृत्त मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे, निवृत्त मुख्याध्यापिका पुष्पा बगाडे , गुरुदेव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ . शशिकला .काकडे , सौ . मंदाकिनी चव्हाण , आलिया सिद्दीकी, महादेव साळुंके , सौ .अनिता चौधरी , गणेश तौर यांना मान्यवरांच्या हस्ते “राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार ” देऊन सन्मानीत करण्यात आले . पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह व सन्मानपत्र असे होते . सुरुवातीला कलबच्या अध्यक्षा सुरेखा सिरसाट यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा तळणीकर यांनी केले . शेवटी वर्षा देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले .
कार्यक्रमासाठी चंद्रकला देशमुख , जयश्री कराड , अनिता फड , रेखा देशमुख, संगिता नावंदर , कल्पना शिंदे , जयश्री लव्हारे , सुरेखा कचरे , रेखा शितोळे , प्रा.तन्वी कमळकर , वासंती बाबजे यांनी सहकार्य केले.
