मुख्यमंत्री लाडका बहीण योजनेस पात्र लाभार्थ्यांच्या यादीत शासकीय योजनांचा फायदा घेणाऱ्या बहुतांश महिलासह नव्हे पुरुषांचीही नावे, सिस्टीम मधील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री लाडका बहीण योजनेस पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत शासकीय योजनांचा फायदा घेणाऱ्या बहुतांश महिलाच नव्हे तर काही पुरुषांची नावे ही असल्याचे समोर आल्याने योजनेच्या सिस्टीम मधील त्रुटी दूर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करून वय वर्ष 21 पूर्ण केलेल्या 65 वयाच्या आतील महिलांच्या खात्यावर दरमहा 1500 रु. जमा होतील असा अध्यादेश पारित करण्यात आला. या योजनेत महिलांना नांव नोंदणी करण्यासाठी शासनाच्या वतीने एक पोर्टल सुरू करण्यात आले. निवडणुका तोंडावर असल्याने शासनाने राखी पौर्णिमेचे औचित्य साधून पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर 2 महिण्याचे प्रत्येकी 3 हजार रु. जमाही झाले.
या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यातील एका महाभागाने तब्बल 28 बनावट नावाने पैसे लाटल्याचे निदर्शनास आल्या नंतर सर्वत्रच असा गोंधळ सुरू असल्याचे लक्षात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातही मुख्यमंत्री लाडका बहीण योजनेस पात्र झालेल्या आज पर्यंतच्या लाभार्थ्यांच्या यादीत शासकीय योजनांचा फायदा घेणाऱ्या बहुतांश महिला ज्या मध्ये संजय गांधी, श्रावण बाळ योजने मध्ये पात्र राहिलेल्या व दरमहा अनुदान उचलणाऱ्या अनेक महिलांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आले असून एवढंच नव्हे तर या यादीत काही पुरुषांची नावे ही असल्याचे समोर आले असुन काही महाभाग लाडक्या बहिणींनी काय गोलमाल केला माहीत नाही त्यांना 2-3 नावाने पैसे जमा झाल्याचे समोर आल्याने योजनेच्या सिस्टीम मध्ये अनेक त्रुटी असून या त्रुटी अशाच राहिल्या तर शासनाला लाडक्या बहिणीच्या नावावर चांगलाच चुंना लागण्याची शक्यता असल्याने सिस्टीम मधील दूर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
