अंबाजोगाईत लालपरीची चाके जागच्या जागी थांबली, आगारातील 100 टक्के कामगारांचा संपात सहभाग, वाहतुक व्यवस्था विस्कटली प्रवाशांची मोठी गैरसोय
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई आगारातील चालक आणि वाहक मिळून 212 कामगारांनी प्रत्यक्ष पणे राज्यव्यापी सुरू झालेल्या संपात सहभाग नोंदवल्याची माहिती आगार प्रमुखांच्या वतीने देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अंबाजोगाई आगाराच्या लालपरीची चाके जागच्या जागी थांबल्याने संपात 100 टक्के कामगार सहभागी असल्याचा दावा महाराष्ट्र एस टी कामगार कृती समिती अंबाजोगाई आगाराच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान एस टी कामगारांच्या या संपाने वाहतुक व्यवस्था पूर्णपणे विस्कटली असून प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षा पासून राज्यातील एस टी कामगार वेतन वाढी सह अन्य मागण्यांसाठी शदन दरबारी लढा देत असून कुठल्याही शासनाला कामगारा करवी पाझर काही फुटतात दिसत नाही. त्या मुळेच 3 सप्टेंबर पासून राज्यातील कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आसून यात अंबाजोगाई आगाराच्या लाल परीची चाके ही जागच्या जागी थांबली आहेत. अंबाजोगाई आगारात एकूण 446 कामगार कार्यरत असून या पैकी 183 चालक, 176 वाहक, 32 कामगार प्रशासकीय असून 55 कामगार कार्यशाळेत (तांत्रिक विभाग) कार्यरत आहेत. यातील 32 प्रशासकीय कामगार, 55 कार्यशाळेतील कामगार, 71 चालक आणि 66 वाहक हे साप्ताहिक सुट्टी सह दौऱ्यावर असून 10 चालक वाहक रजेवर आहेत. आगारातील 109 चालक आणि 103 वाहक असे एकूण 212 कामगार प्रत्यक्ष संपात सहभागी झालेले आहेत. अशी माहिती आगार प्रमुख राऊत यांनी दिली आहे.
संपात 100 टक्के कामगार सहभागी असल्याचा कृती समितीचा दावा
दरम्यान राज्यव्यापी एस टी च्या संपात अंबाजोगाई आगारातील 100 टक्के कामगार सहभागी असल्याचा दावा महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने करण्यात आला असुन अंबाजोगाई आगाराच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर दिलीप लव्हारे, गणेश फड, योगीराज चाटे, शहाजी यादव, रणजित चंदनशिवे, नितीन वाघमारे, हनुमंत गुट्टे, गणेश लव्हारे या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आगारातील 100 टक्के कामगारांनी प्रत्यक्ष पणे राज्यव्यापी सुरू झालेल्या संपात सहभाग नोंदवला असल्याने अंबाजोगाई आगाराच्या लालपरीची चाके जागच्या जागी थांबली आहेत. एस टी कामगारांच्या या संपाने वाहतुक व्यवस्था विस्कटली असून प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.