संततधार पावसाचा अंबाजोगाई सह केज मतदार संघातील शेतकऱ्यांना फटका
खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आ नमिता मुंदडा यांनी शासना कडे मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : राज्य भरात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका अंबाजोगाई तालुक्यालाही बसला असुन तालुक्यातील अनेक गावात शेतात पाणी शिरून शेतीचे मोठ्या प्रमानावर नुकसान झाल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आसुन केज विधानसभा मतदार संघातील (जि. बीड) अंबाजोगाई, केज व बीड, तालुक्यातील नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आ नमिता मुंदडा यांनी शासना कडे मागणी केली आहे. गेली 3 ते 4 दिवसा पासून संपूर्ण महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागली आहेत. अनेक नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने काही गावचा संपर्क ही तुटला गेला आहे. या संतत धार पावसाचा फटका अंबाजोगाई तालुक्यालाही बसला असून अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील अनेक गावातील घरात पाणी शिरले गेले आहे, अनेक घरांच्या भिंती पडल्याने मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शहरातील वाढलेल्या अतिक्रमणा मुळे अनेक ठिकाणी नाल्या, नाले तुंबल्या मुळे रस्त्यावर घाण पाणी वाहू लागले. शहरातील जुन्या भागात जैन गल्ली येथे पहाटे चीरबंदी भिंत एका चारचाकी गाडीवर कोसळल्याने या गाडीचे मोठ्या प्रमानावर नुकसान झाले असून दुर्दैवाने यात कुठलीही मनुष्य हानी झालेली नाही.
तालुक्यातील अनेक गावात शेता मध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमानावर नुकसान झाले असून सर्वत्र ओला दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
“शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आ मुंदडा यांची मागणी”
केज विधानसभा मतदार संघातील (जि. बीड) अंबाजोगाई, केज व बीड, तालुक्यातील नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आ नमिता मुंदडा यांनी शासना कडे मागणी केली आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, केज विधानसभा मतदार संघातील (जि. बीड) अंबाजोगाई, केज व बीड, तालुक्यात दि. ३१/०८/२०२४ रोजीच्या सायंकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सततच्या पावसामुळे अतिवृष्ठी झाल्याने तिन्ही तालुक्यातील खरीपाची पिके धोक्यात आली असून, मोठ्याप्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. केज विधानसभा मतदार संघातील (जि. बीड) अंबाजोगाई, केज व बीड, तालुक्यातील अतिवृष्ठीमुळे नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणेबाबत आदेश व्हावेत अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री ना एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मा ना धनंजय मुंडे, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कडे केली आहे.